वेंगुर्ले
नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने संयुक्त केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन 2.0 मोहिमे वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सागरतीर्थ येथील डोंगर परिसराची स्वच्छता करण्यात आली.
नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठानच्या च्या माध्यमातून सातत्याने विविध समजपायोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातीला पर्यटन स्थळ असलेल्या सागरतीर्थ येथील डोंगर परिसराची स्वच्छता करण्यात आली. सागरतीर्थ समुद्र किनाऱ्या पासून जवळच असलेल्या डोंगर परिसरात निसर्ग रम्य वातावरणात आणि उंचावरून विलोभनीय समुद्र किनारा दर्शन यामुळे पर्यटकांची स्थळाला नेहमीच पसंती असते. त्यामुळे या डोंगर परिसरात असलेला प्लास्टिक व इतर स्वरूपात असलेला कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. त्याच बरोबर पायथ्याशी असलेल्या सुरूच्या बनातही असलेला प्लास्टिक व दीर्घकाळ टिकणारा अविघटनशील कचरा उचलून परिसर स्वच्छता करण्यात आली. यावेळी वेताळ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी श्रमदानातून स्वच्छता उपक्रम यशस्वीपणे राबविला. डोंगर स्वच्छ्ता सारखा आगळावेगळा उपक्रम राबवत पर्यावरण रक्षणासाठी एक नवीन पाऊल टाकल्याबद्दल स्थानिकांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.