You are currently viewing ज्येष्ठ नागरिक संघातर्फे किल्ले स्पर्धा..

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे किल्ले स्पर्धा..

ब‍ांदा

ज्येष्ठ नागरिक संघ बांदा तर्फे दरवर्षीप्रमाणेच दिवाळी निमित्त बांदा मर्यादित किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. स्पर्धा पंधरा वर्षांखालील मुलामुलींसाठीच आयोजित करण्यात आली आहे. कोणत्याही किल्ल्याची पर्यावरण पूरक साहित्य वापरून प्रतिकृतीतयार करावयाची आहे.प्रथम पारितोषिक १०००,द्वितीय ७५०,तृतीय पुरस्कार ५०० आणि उत्तेजनार्थ पारितोषिक २०० प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह अशी आकर्षक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

इच्छुकांनी आपली नोंदणी श्री जगन्नाथ सातारकर,तुळशीदास धामापूरकर,गुरुनाथ नार्वेकर यांचेकडे २४ऑक्टोबर पर्यंत मोबाईल नंबर सह करावी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघ बांदा तर्फे करण्यात येत आहे.स्पर्धेचे परीक्षण २७ व २८ ऑक्टोबर रोजी करण्यात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 4 =