You are currently viewing संजय राऊत यांचा राज्यपालांना चिमटा…. देशात सध्या फक्त दोनच राज्यांत राज्यपाल आहेत!!!

संजय राऊत यांचा राज्यपालांना चिमटा…. देशात सध्या फक्त दोनच राज्यांत राज्यपाल आहेत!!!

 

मुंबई:

 

महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील कटुता दिवसेंदिवस वाढत आहे. कोश्यारी यांनी अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे यात भर पडली आहे.सध्या कोश्यारी हे शिवसेनेच्या रडारवर आहेत. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देशात फक्त महाराष्ट्र व पश्चिम बंगाल या दोन राज्यांतच राज्यपाल आहेत, असा अप्रत्यक्षपणे टोला राज्यपालांना हाणला आहे.

‘राज्यपाल हा केंद्र सरकारचा व राष्ट्रपतींचा एक राजकीय एजंट असतो. कारण ते पूर्णपणे राजकीय काम करतात. सध्या देशात फक्त दोनच राज्यांत राज्यपाल आहेत. त्यातील एक महाराष्ट्रात व दुसरे पश्चिम बंगालमध्ये. कारण इथ केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा विरोधकांची सरकारे आहेत,’ असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून राज्यपाल कोश्यारी यांनी घेतलेल्या अनेक भूमिकांमुळे वाद निर्माण झाले आहेत. शपथविधीपासूनच याची सुरुवात झाली होती. कालांतराने विधान परिषदेच्या निवडणुका, अंतिम वर्षांच्या परीक्षेच्या मुद्द्यावरून सरकार व राज्यपालांमध्ये सातत्याने खटके उडत राहिले. मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर राज्यपालांनी मुख्यमंत्यांना लिहिलल्या पत्रामळे अलीकडेच नवा वाद निर्माण झाला होता. या पत्रातून राज्यपालांनी एखाद्या राजकीय नेत्याच्या थाटात मुख्यमंत्र्यांना सुनावले होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मुख्यमंत्र्यांनीही त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित राज्यपालांच्या पत्राबद्दल व त्यातील भाषेबद्दल चिंता व्यक्त केली होती. शिवसेनेने ‘सामना’तूनही राज्यपालांवर जोरदार तोफ डागली होती. आज पुन्हा एकदा राऊत यांनी राज्यपाल व त्यांच्या निमित्ताने केंद्र सरकारला टोला हाणला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 17 =