सावंतवाडी :
तळवडे येथे स्वर्गीय प्रकाश परब यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, रुपेश राऊळ, सतीश सावंत यांच्यासह इतर पदाधिकारी आज एकाच मंचावर आले. यावेळी दोघात काय चर्चा होते, कोण एकमेकांना टोलवतात, याकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र त्या दरम्यान श्री.केसरकर यांनी गुगली टाकलीच. मी ज्यांना प्रेम दिले, तेच आज माझ्या विरोधात बोलत आहेत, असे सांगून त्यांनी ठाकरे गटाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांकडे पाहिले. यावेळी त्यांनी सुद्धा स्मितहास्य करत प्रतिसाद दिला. त्यामुळे सभागृहात एकच हसा पिकला.
ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केसरकर शिंदे गटात केल्यानंतर त्यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. केसरकर हे गद्दार असल्याचे सांगत त्यांनी घेतलेली भूमिका योग्य नाही ते शिंदे गटात गेले तरी पक्ष संपला नाही असं दावा करत त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.
त्यानंतर आज होणाऱ्या कार्यक्रमात सगळे जुने जाणते एका व्यासपीठावर आल्यामुळे नेमके काय बोलणार ? कुठच्या विषयावर एकमेकांवर टीका करणार याकडेच अनेकांचे लक्ष लागले होते. त्यानुसार केसरकर यांनी आपल्या भाषणात “मी एकत्र असताना अनेकांना प्रेम दिले, आपलेसे केले परंतु तेच आज माझ्या विरोधात बोलत आहे, असे गुगली टाकून ठाकरे गटाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांकडे नजर फिरवली.