मुंबई
नाणार रिफायनरी प्रकल्प संदर्भात पॅनल स्थापन करून एका महिन्याच्या आत चौकशीचा अहवाल सादर करायला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलेला आहे. अनेक संघटनांची ती मागणी होती. मी स्वतः रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेऊन सगळे पुरावे बाहेर काढले होते की; यामध्ये शिवसैनिकांची या सगळ्या व्यवहारमध्ये त्यांची नावे अणि मुख्यमंत्र्यांच्या मावस भाऊ त्यांच्या कंपनीचं नाव हे सगळ मी मिडिया समोर मांडलं होते आणि आम्हाला चौकशीची अपेक्षा होती. आता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी चौकशी लावायचे आदेश दिले आहेत. या गोष्टीचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. असे भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले.
श्री. राणे पुढे म्हणाले की, चौकशी पारदर्शक व्हावी. राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. कारण यामध्ये अधिकारी आहेत त्यांना देखील शिक्षा झाली पाहिजे. नुसती चौकशी लावून उपयोग नाही. त्याचा मागोमाग शिक्षा झाली पाहिजे तरच त्या चौकशीला काही उपयोग आहे. जे शिवसैनिक ह्या जमीन घोटाळ्यात असतील, ज्यांनी शेतकऱ्यांकडून कवडी मोल भावाने घेऊन परप्रांतियांना लाखो करोडोमध्ये ह्या जमिनी विकल्या आहेत; त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या चौकशीचा जो काही अहवाल येईल तो खरा असला पाहिजे. कुणालाही झुकत माप देता कामा नये. तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असला तरी जमीन घोटाळ्यामध्ये इकडच्या परिसरातील प्रत्येक माणसाला माहिती आहे की, नाणार रिफायनरी प्रकल्प जमीन घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. तो भ्रष्टाचार उघड झाला पाहिजे. तो खरा झालेला घोटाळा महाराष्ट्रासमोर उघडकीस आला पाहिजे. एवढीच अपेक्षा आम्ही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या कडून ठेवतो. आणि हा अहवाल जेव्हा येईल त्याची आम्ही वाट बघतोय. असे श्री राणे यांनी शेवटी सांगितले.