बांदा
बांदा येथील योग समिती यांच्या वतीने पतंजली दीपोत्सव महोत्सवाला आजपासून सुरवात झाली.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पतंजली योग समिती बांदा यांच्या वतीने 21ते 26 आक्टोंबर या कालावधीत दररोज दिवे प्रज्वलीत करून योगाभ्यास केला जाणार आहे. बांदा येथील पतंजली योगसमितीच्या वतीने भारतीय सण उत्सवाच्या निमित्ताने अनोखे उपक्रम राबवून लोकापर्यंत योगाची जनजागृती व प्रचार करण्याचा प्रयत्न केला जात आहे्. या अगोदर 21 दिवस पतंजली गणेश 10 दिवस पतंजली नवरात्री उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
पतंजली दिपोत्सव कार्यक्रम प्रसंगी भारत स्वाभिमान महाराष्ट्र राज्य प्रभारी बापूजी पाडळकर पतंजली योगसमिती महाराष्ट्र राज्य प्रभारी शेखरजी खापणे , पतंजली योगसमिती जिल्हा प्रभारी महेशजी भाट,विकासजी गोवेकर रावजी परब पतंजली योगसमिती बांदाचे कक्षा प्रमुख शेखर बांदेकर, संजय नाईक,विकी केरकर,नंदू महाजन , लक्ष्मण पावसकर, राजा सावंत,आपा चिंदरकर,प्रियंका हरमलकर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बांदा पतंजली योगवर्गाचे साधक विशेष मेहनत घेत आहेत.बांदा पतंजली समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.