You are currently viewing दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानांवर ऑफलाईन धान्य वितरीत करा…

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानांवर ऑफलाईन धान्य वितरीत करा…

भाजपची मागणी; लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर लिहून ठेऊन सोयीनुसार ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण करा…

बांदा

येथील शासनमान्य रास्त धान्य दुकानात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नेटवर्क अभावी अंगठा न लागल्यास ऑफलाईन धान्य वितरित करावे, लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर लिहून घ्यावे व सोईनुसार ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी लोकांची अडवणूक करू नये अशी मागणी बांदा भाजपच्या वतीने करण्यात आली.
आज सकाळी बांदा रास्त दुकानात नेटवर्कच्या अडचणीमुळे धान्य वितरित होत नसल्याच्या तक्रारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यामुळे भाजपचे ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, संदीप बांदेकर, सुभाष मोर्ये, डुमा बांदेकर यांनी याठिकाणी येत ऑफलाईन धान्य वितरित करण्याची मागणी केली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लोकांची अडवणूक करू नका. त्यांना तात्काळ धान्य देऊन मागाहून ऑनलाईन प्रक्रिया करावी अशी मागणी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा