You are currently viewing आत्मनिर्भरचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मिळणार…

आत्मनिर्भरचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मिळणार…

स्वतंत्र आत्मनिर्भर भारत कक्ष स्थापन करणारी वाभवे-वैभववाडी देशातील एकमेव नगरपंचायत आ नितेश राणे

वाभवे – वैभववाडी न. पं.मध्ये आत्मनिर्भर कक्षाचे उद्घाटन

वैभववाडी प्रतिनिधी
आत्मनिर्भर भारत योजना नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मिळणार आहे. आत्मनिर्भर भारत योजनेचा सुलभ लाभ लाभार्थ्यांना व्हावा यासाठी वाभवे- वैभववाडी नगरपंचायतच्या वतीने स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत कक्ष स्थापन करणारी ही देशातील एकमेव नगरपंचायत आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत. या योजनेचा लाभ घेऊन नागरिक निश्चित स्वावलंबी व आत्मनिर्भर बनतील असा विश्वास भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

वाभवे – वैभव नगर पंचायतीमध्ये आत्मनिर्भर कक्षाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष समिता कुडाळकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, जिल्हा संयोजक प्रमोद रावराणे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, लाभार्थी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना आ. नितेश राणे म्हणाले, नगर पंचायतीमध्ये कक्ष सुरू केल्याबद्दल नगराध्यक्ष नगरसेवक व अधिकारी यांचे अभिनंदन करतो. या योजनेच्या अंतर्गत असलेल्या सर्व योजना ची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. लाभार्थी वाढविणे व या केंद्राची मदत त्या लाभार्थी पर्यंत पोचविणे, कागदपत्राची माहिती देणे ही सर्व जबाबदारी सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांची आहे. या योजनेचा तालुक्यातील लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. मदत पोहोचविण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारत विभागाचे प्रतिनिधी श्री पाटील, मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी यावेळी माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा