You are currently viewing सावंतवाडीत बाल रुग्णांचे मोफत सर्जरी शिबिर संपन्न

सावंतवाडीत बाल रुग्णांचे मोफत सर्जरी शिबिर संपन्न

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व सिंधुदुर्ग सर्जिकल सोसायटी चे अध्यक्ष डॉक्टर अमोल पावसकर यांच्या संयुक्त विद्यमानाने बाल रुग्णांचे मोफत सर्जरी शिबिर आज दिनांक 19/ 10/ 2022 रोजी आयोजित केले होते .

यामध्ये बाल रुग्णांना लघवीचे त्रास, अपेन्डिस, हर्निया व थायमॉशीर तसेच इतर काही आजारांवर जवळपास तीन ते पाच वयोगटातील 13 बाल रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

या उपक्रमाला ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळाला कुडाळ, होडावडे, शिरोडा, परुळे ,उपवडे या ठिकाणावरून बाल रुग्ण आले होते.श्रीमंत युवराज राजे यांच्या शुभ हस्ते फीत कापून उपजिल्हा रुग्णालयातील सुसज्ज अशा ऑपरेशन थेटरचा शुभारंभ करण्यात आला.

डॉ. अमोल पावसकर यांनी याही पुढे असे उपक्रम संयुक्तपणे राबवले जातील जेणेकरून गोरगरीब रुग्णांना सेवा मिळावी हा या उपक्रमाचा एकमेव उद्देश आहे असे मत त्यांनी व्यक्त केले .याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व संजय पेडणेकर, अजय गोंदावले, तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.दुर्भाटकर सर, स्वरूप हॉस्पिटलचे डॉ. अमोल पावसकर सर , भूलतज्ञ डॉ. सूर्यवंशी सर, डॉ. संदीप सावंत, डॉ. महेंद्र आचरेकर सर, डॉ. विद्याधर ताई शेटे सर, डॉ.आदेश पालेकर डॉ. सागर कोल्हे, डॉ.मुरली, डॉ.लादे डॉ. आकाश सर, डॉ. आदित्य सर, डॉ. विष्णू सर , डॉ.अवधूते सर व सिस्टर व हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा