You are currently viewing कुडाळ एम्. आय्. डिसीच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील

कुडाळ एम्. आय्. डिसीच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे एम्. आय्. डि. सी. असोसिएशनच्या शिष्टमंडळाला आश्वासन.

या जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील असून कुडाळ एम्. आय्. डिसी ही या जिल्ह्यातील सर्वात जुनी एम्. आय्. डि. सी. असून त्याच्या विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन असे आश्वासन एम् आय्. डि. सी. असोसिएशनच्या शिष्टमंडळाला सामंत यांनी दिले.
मा. उदय सामंत यांच्या मलबार हिल, मुंबई येथील मुक्ताई येथील निवासस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष श्री मोहन होडावडेकर, कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, उद्योजक व माजी अध्यक्ष आनंद बांदिवडेकर, सहकार्यवाह श्री कुणाल वरसकर आदी पदाधिकारी उद्योगमंत्र्याना भेटले. कुडाळ एम्. आय्. डि.मध्ये अनेक प्लाॅट रिक्त असून नव उद्योजकांना त्यांच्या विनंतीनुसार व मागणीनुसार दिल्यास नव उद्योजकांना त्याचा फायदा होवू शकतो तसेच विद्युत समस्येमुळे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भारनियमन व कमी दाबाच्या विद्युत पुरवठा याबाबत नवीन सबस्टेशनची मागणी असोशिएशनने केलेली असून त्यासाठी एम्. आय्. डि. सी. विभागाकडून सबस्टेशनला जागा तातडीने उपलब्ध करुन कार्यवाही करण्याची विनंती असोसिएशनने केली असून याबाबत आपण लवकरच सर्व उद्योजकांची बैठक घेऊन सर्व प्रश्र्न लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे उद्योग मंञ्याना सांगितले.


*फोटो कॅप्शन- उद्योग मंञ्याना शिष्टमंडळाने भेट दिली याप्रसंगी श्री मोहन होडावडेकर, अॅड. नकुल पार्सेकर, श्री आनंद बांदिवडेकर व श्री कुणाल वरसकर*.

प्रतिक्रिया व्यक्त करा