सावंतवाडी
सेवाभावी संस्थांनी गोवा रेडक्रॉस चेअरमन तथा रोटरी माजी प्रांतपाल गौरिश धोऺड यांचेकडे केलेल्या अत्यावश्यक मागणीची दखल घेऊन, रोटरी ट्रस्ट सावंतवाडी येथे माझा वेऺगुर्ला ट्रस्टला आवश्यक दोन कॉन्सेट्रेटर आणि रोटरी ट्रस्ट सावंतवाडीला दोन कॉन्सेट्रेटर व दोन व्हिलचेअर गोवा रेडक्रॉस या सेवाभावी संस्थेच्यावतीने मोफत प्रदान करण्यात आले.
वेऺगुर्ले, सावंतवाडीतील अनेक रुग्णांना कॉन्सेट्रेटर, व्हिलचेअर, मेडिकल बेड अशा विविध वैद्यकीय सेवासाधनऻची तातडीने गरज भासत असते. माझा वेऺगुर्ला ट्रस्ट वेऺगुर्ला परीसरातील व रोटरी ट्रस्ट सावंतवाडी ही सावंतवाडी परीसरातील गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवासाधनऻची उपलब्धता करून देण्यासाठी प्रयत्न करत असते. या वैद्यकीय सेवासाधनऻची वाढती मागणी लक्षात घेऊन, या सेवाभावी संस्थांनी गोवा रेडक्रॉस चेअरमन तथा रोटरी माजी प्रांतपाल गौरिश धोऺड यांना विनंती केली होती. याची तातडीने दखल घेऊन, माझा वेऺगुर्ला ट्रस्टला आवश्यक दोन कॉन्सेट्रेटर आणि रोटरी ट्रस्ट सावंतवाडीला दोन कॉन्सेट्रेटर व दोन व्हिलचेअर गोवा रेडक्रॉस या सेवाभावी संस्थेच्यावतीने मोफत प्रदान करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर, गोवा रेडक्रॉस चेअरमन गौरिश धोऺड, माजी असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ, सावंतवाडी रोटरी क्लब प्रेसिडेंट विनया बाड, इनरव्हिल प्रेसिडेंट दर्शना रासम, विश्वस्त वसंत करंदीकर, साईप्रसाद हवालदार यांचा समावेश होता.