You are currently viewing रिझर्व बँकेतून थेट पेन्शन धारकाच्या खात्यात होणार रक्कम जमा

रिझर्व बँकेतून थेट पेन्शन धारकाच्या खात्यात होणार रक्कम जमा

रिझर्व बँकेतून थेट पेन्शन धारकाच्या खात्यात होणार रक्कम जमा

सिंधुदुर्गनगरी

 माहे मार्च 2024 पासून जिल्हा कोषागार कार्यालय येथे निवृत्तीवेतन धारकांचे निवृत्ती वेतन विषयक लाभ प्रदान करण्यासाठी ई-कुबेर हि प्रणाली कार्यान्वीत झाली असून यापुढे निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधून थेट रक्कम जमा होणार आहे.

यापूर्वी फक्त मुंबई, नागपूर, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हि प्रणाली कार्यान्वीत होती. राज्य शासनाच्या धोरणानुसार सर्व जिल्ह्यामध्ये हि प्रणाली कार्यान्वीत करावयाची असून जिल्हा कोषागार कार्यालय सिंधुदुर्ग यांनी तत्परता दाखवून जिल्ह्यात ई-कुबेर प्रणाली कार्यान्वीत केली असून यापुढे पेन्शनधारकांच्या खात्यात अधिक जलदगतीने रक्कम जमा होणार आहे.

या प्रणालीतून खात्यामध्ये रक्कम आय.एफ.एस.सी. कोडनुसार जमा होणार असल्याने ज्या निवृत्ती वेतनधारकांनी जिल्हा कोषागार कार्यालयाला न कळविता परस्पर बँक अथवा बँक शाखा बदलून घेतली असेल अशा निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास अडचण निर्माण होणार आहे. तरी ज्या निवृत्ती वेतनधारकांनी कोषागार कार्यालयाला न कळविता परस्पर बँक अथवा बँक शाखा बदलून घेतली असेल अशा निवृत्ती वेतन धारकांनी त्यांच्या मूळ बँकेचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि नवीन खात्याच्या बँक पासबूकाच्या प्रतीसह त्वरीत जिल्हा कोषागार कार्यालय येथे संपर्क साधावा.

तसेच जे निवृत्ती वेतनधारक अद्याप मनीऑर्डरने मासिक निवृत्ती वेतन स्विकारत आहेत अशा निवृत्ती वेतनधारकांनी पेन्शनचे लाभ जलदगतीने घेण्यासाठी तसेच पोस्टाची दिरंगाई आणि पोस्टल चार्जेस वाचविण्यासाठी नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेत पेन्शन खाते उघडावे व जिल्हा कोषागार कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 1 =