You are currently viewing सद्गुरू..

सद्गुरू..

 

*जीवनाच्या सर्वच क्षेत्रात मार्गदर्शकाचे म्हणजेच गुरूचे स्थान वादातीत आहे.परमार्थाच्या क्षेत्रात तर सद्गुरूचे महत्त्व अपरंपार आहे. स्थूल स्वरूपाच्या विद्या व कला गुरूशिवाय आकळता येत नाहीत मग अध्यात्मविद्येसारखी सूक्ष्मविद्या सद्गुरूशिवाय आत्मसात करता येणे शक्य आहे का? अध्यात्मविद्येचे स्वरूपच न समजल्यामुळे हा सर्व घोटाळा निर्माण झालेला आहे.अध्यात्मशास्त्र शिकायचे म्हणजे आपल्या जीवनातील फार मोठे गुह्य आकळणे होय.परंतु खेदाची गोष्ट अशी आहे की,या सत्याची जाणीव परमार्थात पडलेल्या बहुसंख्य लोकांना नसते. खरे सद्गुरू भेटतात तेव्हाच या सत्याची जाणीव साधकाला होते व ते सद्गुरूच साधकाला जीवनातील मोठे गुह्य समजावून देऊन त्या महान गुह्याची उकल कशी करून घ्यायची त्याचा स्पष्ट मार्ग दाखवितात.*

 

 

🟠 *सद्गुरूकृपेने हृदयातील गुप्तरूप प्रगट होते तेव्हा साधकाचे जीवनातील दुःख गुप्त होऊन त्याला सर्वसुख प्राप्त होते.*

 

 

🟠 *कोणाही एखाद्या बाईला बायको मानून संसार करता येत नाही,त्याप्रमाणे कोणासही सद्गुरू मानून परमार्थ होत नाही.*

 

 

🟠 *वृत्तीरहित अवस्था हे साध्य नसून केवळ एक पोकळी आहे.ही पोकळी आत्मज्ञानाच्या प्रकाशाने कशी भरून व भारून टाकायची हे शिकवितात ते सद्गुरू.*

 

 

🟠 *प्रपंचात अडचणी फार तर परमार्थात अडचणी जवळ जवळ नसतातच.नाही म्हणायला फक्त एकच अडचण आहे व ती म्हणजे खऱ्या सद्गुरूंची भेट होऊन त्यांच्याकडून अचूक मार्गदर्शन मिळणे,ही होय*.

 

🟠 *”ब्रह्म हे सिद्ध आहे म्हणून अशा सहज सिद्ध वस्तूच्या प्राप्तीसाठी साधनेची काहीच आवश्यकता नाही” असा उपदेश करणारे गुरू हे गुरू नसून शत्रू जाणावेत.*

 

🟠 *शिष्यावर गुरगुरणारे किवा गुरूदक्षिणेवर डोळा ठेवून असणारे गुरू सर्वत्र असतात विपुल,परंतु सत्साधकांचा ‘डोळीयांचा डोळा उघडून त्यांच्यावर आनंदाचे लेणे चढविणारे सद्गुरू मात्र असतात दुर्मिळ*

 

 

🟠 *सद्गुरूंची गाठ पडल्याशिवाय चित् जड ग्रंथीची गाठ सुटत नाही.*

 

 

🟠 *सद्गुरू कृपेशिवाय परमार्थातील रहस्य आकळता येत नाही व हे रहस्य आकळल्याशिवाय परमार्थात स्वारस्य प्राप्त होत नाही.*

 

 

🟠 *सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली जे सत्साधक परमार्थाचा प्रवास आकाश मार्गाने करतात ते भगवंताच्या चरणी सुखाने व सहज पोहोचतात.*

 

 

🟠 *’हृदयातील देव अंत:करणात कसा धरून ठेवायचा’ हे शिकवितात ते सद्गुरू.*

 

 

🟠 *”सद्गुरू महिमा अगाध ही स्तुती नसून वस्तुस्थिती होय.*

 

 

🟠 *परमार्थात “आहे ते वर्म वेगळेची” हे मर्म ज्यांच्या कृपेने आकळते ते सद्गुरू*

 

 

🟠 *प्रथम नाम धरावयास शिका. मग राम कसा धरायचा ते सदगुरू शिकवतील*

 

 

🟠 *खरे सद्गुरू भेटणे हे सत्साधकाचे परमभाग्य होय.*

 

 

🟠 *गुरू असतात अनेक मात्र सदगुरू असतात फक्त एक.*

 

 

🟠 *माळ मंत्र देणारे ते गुरू तर सद् वस्तूशी भिडविणारे ते सदगुरू*

 

 

🟠 *स्वरूप साक्षात्काराचा अचूक मार्ग दाखविणारे ते सदगुरू,बाकीचे सर्व गुरु किंवा येरू समजावेत.*

 

 

🟠 *स्वरूपाचा वेध लागणे ही सद्गुरूकृपेची खुण होय.*

 

 

🟠 *सद्गुरूंना पूर्ण शरण गेलेला शिष्य सद्गुरू रूप होय.*

 

 

🟠 *परमार्थात काय “अर्थ” भरलेला आहे.हे खरे सदगुरू भेटल्याशिवाय समजणे कठीणच आहे.*

 

 

🟠 *श्री सद्गुरूची प्राप्ती ही एक दुर्मिळ गोष्ट आहे.*

 

 

🟠 *खरा सद्गुरू भेटेपर्यंत सद्गुरूचे महत्त्व व माहात्म्य सामान्यजनांना कळा एकंदरीत कठीणच आहे.*

 

 

🟠 *गल्लीपासून दिल्लीपर्यंत गुरू आहेत विपुल,परंतु परमार्थाची गुरु सत्साधकांच्या हातात देणारे सद्गुरू आहेत दुर्मिळ.*

 

 

🟠 *गुरू म्हणजे हृदयात वास करणारे गुप्तरूपःते गुप्त रूप जो स्पष्टपणे दाखवितो तो सद्गुरू.*

 

 

🟠 *”सहज असणारा देव सहज कसा प्राप्त करून घ्यावयाचा’ हे शिकवितात ते सद्गुरू.*

 

 

🟠 *”तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी” या संत उक्तीप्रमाणे श्री सद्गुरू साधकाला जागा करून त्याला त्याच्याचपाशी असलेल्या देवाचा जागा दाखवितात.*

 

 

🟠 *युक्तीने मन कसे धरावयाचे हे शिकवितात ते सद्गुरू.*

 

 

*🟠 परेच्या पलीकडील देवाच्या प्रांतात आकाशमार्गाने जाऊन प्रत्यक्ष प्रवेश कसा करावयाचा हे शिकवितात ते सद्गुरू.*

 

 

🟠 *सद्गुरूचा महिमा ज्याला समजत नाही त्याच्यासाठी परमार्थ नाही.*

 

 

🟠 *खरे सद्गुरू भेटेपर्यंत परमार्थात पडलेल्या बहुसंख्य साधकाची अवस्था “बोलाची कढी बोलाचा भात | जेवोनिया तृप्त कोण जाहला || ” अशा प्रकारची असते.*

 

 

🟠 *देवापेक्षाही सद्गुरू श्रेष्ठ,असे ज्या साधकाला मनापासून वाटते, तो साधक सत्साधक जाणावा.*

 

 

🟠 *प्रयत्न करावयाचे असतात ते सद्गुरू प्राप्तीसाठी,देवासाठी नाही,कारण खऱ्या सद्गुरूचा अलभ्यलाभ झाला की देव हातात आपोआपच येतो.*

 

 

🟠 *’अगदी निकट असलेल्या अनंताचे चरणी सतत टक लावून त्याला अंतःकरणात कसा अटक करावयाचा’ हे शिकवितात ते सदगुरू.*

 

 

🟠 *चिन्मय अशा आत्मस्वरूपाशी तन्मय होऊन अंती अनंत स्वरूप होऊन कसे रहावयाचे,हे शिकवितात ते सद्गुरू.*

 

 

🟠 *सद्गुरूकृपेने जी आत्मप्रचीती मिळते तिचे दर्शन घेण्याचे,ग्रंथ हे दर्पण होत.*

 

 

🟠 *संत भगवंताचा काला म्हणजे सद्गुरू.*

 

 

🟠 *सदगुरू म्हणजे सर्वेश्वराचे सगुण साकार रूप.*

 

 

🟠 *गुरूकडून सद्गुरूकडे जाण्यात पाप तर नाहीच पण शुद्ध पुण्य मात्र अपार आहे,कारण खरे सद्गुरू जे कार्य करतात ते गुरूला तथाकथित सद्गुरूला करता येणे केवळ अशक्य होय.*

 

 

🟠 *माणसाच्या सर्व समस्या सहज सुटून तो सुखशांतीच्या नंदनवनात नित्य वास करीत राहील,जर मानवजातीने ‘अखिल मानवजातीचे हित लक्षात घेऊन माणसाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला तर,अन्यथा इतिहासाची पुनरावृत्ती अनंतकाळपर्यंत होतच राहील.*

 

*🙏सद्गुरू श्री वामनराव पै.🙏*

प्रतिक्रिया व्यक्त करा