You are currently viewing प्रेमाची भेट’

प्रेमाची भेट’

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*’प्रेमाची भेट’*
*(संजय धनगव्हाळ)*
************
पहिल्या प्रेमाची भेट म्हणून
मी माझ्या पसंतीची तुला साडी दिली
किती अलगदपणे तू साडीला ह्रुदयाशी धरले
जणूकाही माझ्या प्रेमाचे रंग तू त्यात भरले

त्यानंतर प्रत्येक भेटीला
तू धावत पळत यायची
कितीदा डोळ्यात भरून घ्यायची
त्या भेटीत आपण सुख दुःख
वाटून घ्यायचो
तुझ्या माझ्या आवडीची भेट देताना
एकमेकांना एकमेकांमधे
कितीदा बघायचो

त्या भेटण्याच्या आनंदाला
काहीच मर्यादा नव्हती
वेळेला मात्र हरकत होती
एकमेकांच्या सहवासात
आपण हरवून जायचो
नजरेआड होताना
मागे वळून बघायचो

आणि एकदिवस अचानक
मी दिलेल्या भेटी
तू परत करून गेलीस
काहीन सांगता कायमची
निघून गेलीस
तू असं करशील
असे कधी वाटले नव्हते
तुझे असे वागणे
जराही पटले नव्हते
खर सांगू, तू गेल्यानंतर
मी तुला रोज आठवत होतो
मला परत केलेल्या भेटींच्या गर्दीत
मी दिलेली साडी शोधत होतो

तू माझ्या सगळ्या भेटी परत केल्यात
पण मी दिलेली साडी मात्र ठेवून घेतली होती
तेव्हाच मला कळले
तू निघून गेलीस तरी माझे प्रेम तुझ्या मनात नेहमीच अमर होते

पण
पण तू अशी वृद्धाश्रमात भेटशील असे कधीच वाटले नव्हते
तुझ्या माझ्या जगण्याचे संदर्भ पुन्हा जुळतील
स्वप्नात सुद्धा पाहिले नव्हते

काय हा नियतीचा खेळ
तू दुसऱ्याची झाल्यावरही वृद्धश्रामचा आधार घेतला…
आणि मी तुझ्या आठवणीत
एकटाच राहीलो म्हणून
वृद्धश्रामाने मला आधार दिला…

मी दिलेली साडी जेव्हा
तुझ्या अंगावर पाहीली,
तेव्हा वाटले बाकी सारे आयुष्य
पुन्हा तुझ्यासोबत जगायचे…
*प्रेमाची भेट* म्हणून तुझ्यावर नव्याने प्रेम करायचे…

*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा