You are currently viewing बाप फुल अनंताचं…..

बाप फुल अनंताचं…..

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना

*बाप फुल अनंताचं…..*

बाप उंबराच झाड बाप फुल अनंताचं
नांगरले ते जहाज,वादळी त्या समुद्रात
ऊन वारा पचवित तप्त बिजली झेलत
येवो किती ही तुफान जरा नाही डगमगत….

 

पाय रोवून भुईत घट्ट मुळे पकडून
किती झपाटतो वारा वर तापतेच ऊन
तरी नांगरतो भुई प्रिय त्याला काळी आई
कदर करा वा ना करा कधी बघतच नाही….

 

कष्टावरच भरोसा घाम गाळतो मातीत
स्वप्न उद्याची पेरतो हिरवाईचे गणित
ऋतू दाखविती ठेंगा तरी नाही उसवत
भगवंत पाठीराखा असे असतो म्हणत …

 

बाप चांदणं नभीचं अंधारातला दिलासा
दीपस्तंभ सागरात दिशा दावण्या खलाशा
आधाराचा आहे वड बिलगती तया वेली
गुलमोहराची जशी तप्त उन्हात सावली …

 

बाप बांध वावराचा जलभरली विहिर
सातबाऱ्यावर बाप वारसाची हो मोहोर
नाही आटत कधीच त्याच्या मायेचा हो झरा
घरादारावर त्याचा असे जागता पहारा…

 

ढाल बनून तो करे, जाई सामोरा वादळा
बाप बुलंद बुरूज मधभरला तो पोळा
बाहेरून कणखर आत नारळ मलई
उबदार हिवाळ्यात पांघरावी ती दुलई..

 

दारी वाजता सनई जीव त्याचा पाणी पाणी
लेक जाणार सासरी गुलछडी माझी गुणी
त्याचे कापते काळीज फुल कोमेजेल का हो
दिसू देत नाही मुळी मन फोडतेच टाहो…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २० जून २०२१
वेळ : दुपारी:२:३२

 

Advertisement

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

*————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा