You are currently viewing कणकवलीत होणार भव्य गार्डन आणि स्पोर्ट कॉम्प्लेक्स…

कणकवलीत होणार भव्य गार्डन आणि स्पोर्ट कॉम्प्लेक्स…

नगराधक्ष समीर नलावडे ;
१५ कोटींचा प्रकल्प, रविवारी राणेंच्याहस्ते भूमिपूजन….

कणकवली
शहरात भालचंद्र आश्रमालगत भव्य गार्डन आणि स्पोटर्स कॉम्प्लेक्स होणार आहे. यातील फेज वनचे भूमिपूजन रविवार १८ ऑक्टोबरला माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिली.
हा प्रकल्प १५ कोटींचा आहे. यात जलतरण तलावाचाही समावेश असल्याचे ते म्हणाले.
शहरातील टेंबवाडी येथील ७४ गुंठे जागेमध्ये नगरपंचायतीचे स्पोटर्स कॉम्प्लेक्स आणि गार्डनचे आरक्षण होते. त्यानुसार मागील दोन वर्षात ही जागा नगरपंचायतीने भूसंपादन करून ताब्यात घेतली. त्यानंतर फेज वनच्या कामासाठी ४ कोटींचा निधी देखील उपलब्ध झाला. त्याची टेंडर प्रक्रियाही झाली. मात्र कोरोना महामारीत हे काम रखडले होते. आता १८ ऑक्टोबरला भव्य गार्डन आणि स्पोर्टस कॉम्प्लेक्सच्या उभारणीचा शुभारंभ होणार आहे. या ठिकाणी जागतिक दर्जाचे उद्यान, अद्ययावत स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि जलतरण तलावाचीही बांधणी होणार असल्याचे श्री.नलावडे म्हणाले. तसेच या कार्यक्रमाला शहरवासीयांनी सोशल डिस्टन्सचे पालन करत उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले

प्रतिक्रिया व्यक्त करा