You are currently viewing व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीयम स्कूल, बांदा मधील विद्यार्थ्यांची विद्युत प्रकल्प ला क्षेत्र भेट

व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीयम स्कूल, बांदा मधील विद्यार्थ्यांची विद्युत प्रकल्प ला क्षेत्र भेट

बांदा

व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीयम स्कूल बांदा मधील इयत्ता आठवी व दहावी मधील मुलांनी दोडामार्ग तालुक्यातील कोनाळकट्टा या गावात सुरू असलेल्या महालक्ष्मी विद्युत प्रायव्हेट लिमिटेड या प्रकल्पाला क्षेत्र भेट देण्यात आली.यावेळी दोन्ही वर्गातील मुली व मुलगे मिळून एकूण ४४ जणांनी या क्षेत्रभेट प्रकल्पामध्ये सहभाग घेतला होता.

या मध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रकल्प सुरू आहे त्याठिकाणी जात कशा पद्धतीने पाण्यापासून वीज निर्मिती होते याची माहिती इलेक्ट्रिकल अभियंता श्री. नाईक तसेच श्री.सुभाष आपटेकर यांनी विद्यार्थ्यांना दिली.

त्याचप्रमाणे पाण्यापासून वीज निर्मिती झाल्यानंतर ही उत्पादीत केलेली ऊर्जा कशा पद्धतीने वितरित केली जाते याची सुद्धा माहीती विद्यार्थ्यांनी घेतली.
त्याचप्रमाणे हायड्रोपाँवर प्लँन्ट ची सखोल माहीती घेतली.

या प्रकल्पामधून निर्माण झालेली वीज वितरित करताना त्याचा दाब ६.६ के.डब्ल्यू ते ३३ के.डब्ल्यू कींवा २२० के.डब्ल्यू ते ३३ के.डब्ल्यू ते ११ के.डब्ल्यू याप्रमाणे वापरात येत आहे माहीती विद्यार्थ्यांनी घेतली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील काही शंका विचारून त्या समजावून घेतल्या. या प्रशाळेतील विद्यार्थी दरवर्षी वेगवेगळ्या ठीणगी क्षेत्र भेट देत असतात. यापूर्वी विद्यार्थ्यांनी कुषी विभाग अंतर्गत कोकण कुषी विद्यापीठ चे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला, औद्योगिक विकास महामंडळ कुडाळ, औद्योगिक विकास महामंडळ माजगाव सावंतवाडी, गोकुळ दुध प्रकल्प ,साखर कारखाना कोल्हापूर अशा विविध ठीकाणी या शाळेतील विद्यार्थी क्षेत्र भेट करत आहेत.

या क्षेत्र भेटीसाठी कामत चँरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मा.श्री मंगेश कामत,प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, एम.एस.एफ.सी.विभाग प्रमुख सौ.रिना मोरजकर यांचे सहकार्य लाभले. या क्षेत्र भेटीमध्ये एम.एस.एफ.एस. समन्वयक राकेश परब, निदेशक भिकाजी गिरप, सौ. रिया देसाई, सौ.गायत्री देसाई, क्रीडाशिक्षक प्रशांत देसाई यांनी सहभाग घेतला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा