You are currently viewing खड्ड्यांमुळे अपघात; वाघेरीतील युवक ठार

खड्ड्यांमुळे अपघात; वाघेरीतील युवक ठार

सा.बा. विभाग आता तरी जागे होणार का?
सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांचा सवाल

कणकवली

फोंडा ते वाघेरी मित्रांसमवेत मोटरसायकल ने जात असताना देवगड निपाणी मार्गावर हॉटेल पुष्पक समोर मोटरसायकल रस्त्यावरील खड्ड्यात जाऊन स्लिप होऊन झालेले अपघातात मकरंद अशोक खेडकर (वय 28 रा. वाघेरी खड्याचा मांगर) हा जागीच ठार झाला तर त्याचा मित्र अमित डऊर हा जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास घडला होता.

फोंड्यावरून मकरंद आणि त्याचा मित्र वाघेरीकडे जात असताना हा अपघात झाला. खड्ड्यात मोटरसायकल स्लिप झाल्याने ते दोघे खाली पडले आणि मकरंदला गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेतली. याबाबतची खबर मकरंदचा भाऊ उमेश खेडकर यांनी दिली. मकरंद हा फोंडाघाट येथे कुक म्हणून काम करत होता. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण करीत आहेत.

फोंडाघाट रस्त्या पडलेल्या खड्ड्यांमुळे आणखी एका तरुण मुलाचा मृत्यु झाला. मागील २ वर्षात ५ जणांनी आपला जीव गमावला. सार्वजनीक बांधकाम, उपविभाग कणकवली आता तरी जागे होणार काय? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी विचारला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 4 =