You are currently viewing स्पर्शांना! स्पर्श द्या!

स्पर्शांना! स्पर्श द्या!

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी बाबा ठाकूर लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*स्पर्शांना! स्पर्श द्या!*

वेळ हरवला तरी चालेल
स्पर्श जपले पाहिजे
बालपणीचे स्पर्श
म्हातारपणी जपले पाहिजे..!
ज्ञानेंद्रिय खोटं बोलतील
पण स्पर्श कधीही नाही
स्पर्शांना!स्पर्श द्या
स्पर्शाला विस्मृती नाही
सुरकतलेली कातडी
नातवानं नाजूक बोटांनी ओढावी
म्हातारीची खोल गालफडं
सुखद स्पर्शाने !लाल व्हावी ..!
शेकडो औषधाची ताकद
एका नात्याच्या स्पर्शात असते
मानवी जीवनाची अथांग गाथा
तीही स्पर्शाने मोहरून जाते
स्पर्श !लाजरे बुजरे!ओथंबलेले स्पर्श
एकमेकांच्या ओंजळीतून सांडणारे स्पर्श
अर्थाचे कंगोरे !स्पर्शात दडलेले स्पर्श
वादळ होवून !अंगावर येणारे स्पर्श
तेच स्पर्श!उतारवयी
मिळेनासे झाले की
जगणं नाती नकोशी होती..!
नाहीतर स्पर्शाविना तळवे
पार कोमेजून जाती …!
गळाभेट!हस्तांदोलन!गालाला गाल
बोटांचा स्पर्शही आश्वासक भासतो
कधी धीट तर कधी आक्रमक स्पर्शही
जगण्याला !आशेची किनार देतो
स्पर्शांना स्पर्श द्या
जमलं तर!एक झप्पी द्या!!!
नाहीतर एखादी पप्पी द्या….!

बाबा ठाकूर

 

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =