कुडाळ :
माणगावात कै.श्रावण धुरी यांच्या स्मरणार्थ महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन विशाल परब यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी कै. श्रावण धुरी माझा मित्र गेली कीत्येक वर्ष माझ्या सोबत राहीला. माझा जीवनात मित्र म्हणून वेळोवेळी सुख दुःखात सहभागी होणारी दिलदार व्यक्ती गेल्याने दुःख झाले. माझ्या मित्र मंडळाकडून तसेच भाजप पदाधिकारी कडून जिल्हात विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक समाजपयोगी कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. माणगावत मला लोकांनी भरभरून प्रेम दिले, असे मनोगत श्री.परब यांनी व्यक्त केले.
गुरुवर्य आकेरकर सर यांनी “आज माझा विद्यार्थी एवढा मोठा झाला हे बघून मला खूप आनंद वाटतो भविष्यात हाच माझा विद्यार्थी आपल्या भागाचं राजकीय प्रतिनिधित्व करताना मला बघून आनंद होईल म्हणून विशालला मी शुभेच्छा देतो आणि भविष्यात तो उच्च पदावर जाण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो “बार बार दिल ये आये तुम जियो हजारो साल” म्हणत विशाल परब यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच मला खासदार किंवा आमदार कि लढवायची नाही. आज मी तीस वर्षातच एवढा मोठा झालो की 50 वयाचा माणूस जेवढे कमवेल तेवढे मी आज कमवतो. महाराष्ट्र, मुंबई, दिल्ली आणि देशात मी फिरतो आणि माझे अनेक मित्र आहेत. घरातील सर्व खासदार आणि मंत्र्यांशी माझे जवळचे संबंध आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील माझ्या मोठा मित्रपरिवार आहेे. शेवटी परमेश्वर जो निर्णय देईल तो मला मान्य असेल. ते शेवटी नियतीच्या हातात आहे. लोकांना मला सढळ हस्ते मदत करायला आवडते. महाराष्ट्रातून अनेक नेते मंडळींकडून आमदार गोपीचंद पडळकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष श्री.बावनकुळे यांनाही मला शुभेच्छा दिल्या. त्यांची मी आभार व्यक्त करतो, अशी श्री. परब म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर विशाल परब सह रणजित देसाई, प्रभाकर परब, प्रकाश मोर्ये, मोहन सावंत राजा धुरी, विनायक राणे, आर के सावंत, पांडू सावंत, रुपेश कानडे, दीपक नारकर, सचिन धुरी,दत्ता कोरगावकर, महेश भिसे, दीपक कानेकर, देवता नाईक, कामिनी भर्तू, केशव भर्तू, आनंद परब ,अमित दळवी, कृष्णा सावंत, दीपक वारंग, परेश धुरी संदीप साटम आदी उपस्थित होते.