You are currently viewing उद्या शनिवारी साजरा होणार युवा उद्योजक व भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस..

उद्या शनिवारी साजरा होणार युवा उद्योजक व भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस..

युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस उद्या शनिवार १५ ऑक्टोंबर रोजी कुडाळ येथील नवीन एसटी बस आगार मैदानावर होणार आहे या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय नव्या पर्वाला १५ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि भाजपचे माजी खासदार तथा प्रदेश सचिव निलेश राणे एकाच व्यासपीठावर येणार आहे.

या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्योग मंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे व उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने महाराष्ट्रात नव्या मित्र मैत्रीचे पर्व यानिमित्ताने सुरू होणार आहे. त्यामुळे एकेकाळीचे कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येणार असल्याने तळकोकणातील राजकीय समीकरणेच या निमित्ताने बदलून जाणार आहेत. ही समीकरण बदलल्यास रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपची ताकद वाढणार आहे. तर कुडाळ मालवण मधून भाजपचे निलेश राणेंची ताकद मजबूत होणार आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी सह पाचही विधानसभा मतदारसंघात भाजपची आणि शिंदे गटाची ताकद यामुळे दुप्पट होणार आहे. निलेश राणे आणि उदय सामंत,किरण सामंत यांच्या मैत्रीचे नविन पर्व या निमित्ताने सुरू होणार आहे.

भाजपचे युवा नेते आणि युवा उद्योजक विशाल परब यांचा १५ ऑक्टोबरला वाढदिवस कुडाळ येथील एसटी डेपो मैदानावर मोठ्या उत्साह हजारोंच्या उपस्थित साजरा होत आहे. या कार्यक्रमाला माजी खासदार निलेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत, सांगोल्याचे दबंग आमदार शहाजी बापू पाटील,भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली,माजी आमदार प्रमोद जठार यास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या वाढदिवसानिमित्त १५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 5 ते 7:३० वाजता संगीतकार अजित कडकडे यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे. रात्रो ७:३० ते 8:१५ युवा नेतृत्व विशाल जी परब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे ८:१५ ते ८:३० पांढरी काठी दिनानिमित्त जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा सत्कार सोहळा होणार आहे. ८:३० ते १०:०० वाजता सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार चैतन्य महाराज यांचा कीर्तन सोहळा होणार आहे. रात्रौ.१०:०० ते १२:०० सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगाले यांचा पोवाडा होणार आहे.१५ ऑक्टोबरचे हे सर्व कार्यक्रम कुडाळ नवीन एसटी स्टँड जवळ होणार आहेत. तरी उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल परब मित्र मंडळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा