You are currently viewing महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्रातील विजेत्यांचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या कडून अभिनंदन

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्रातील विजेत्यांचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या कडून अभिनंदन

सिंधुदुर्गनगरी

तळागाळातील नव उद्योजकांना व नवसंकल्पनांना मुर्तरुप देण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा 2022’ कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या अंतर्गत  संत राऊळ महाराज महाविद्यालय,कुडाळ येथे जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे आयोजन केले होते. यामध्ये शिबीरात प्रथम क्रमांक साहिल चव्हाटेकर, व्दितीय क्रमांक अमोल अशोक राणे व तृतिय क्रमांक स्यामंतक ट्रस्ट यांनी पटकावला, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातील 14 सदस्यांनी यांचे परिक्षण केले. या सर्व विजेत्यांचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी  अभिनंदन केले.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा 2022 अंतर्गत. हे प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्र 13 ऑक्टोबर रोजी संपन्न झाले. जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरणात जिल्ह्यातील 21 नवउद्योजकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.

या कार्यक्रमास एस.एन.डी.टी महिला विश्व महाविद्यालयाचे डॉ. आशिष पानट व सिंधु कॉयरचे संस्थापक हर्षवर्धन बोरावडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख, महात्मा गांधी नॅशनल फेलोच्या शिवानी गरड, प्राचार्य श्री. झोडगे, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. दामले यांच्यासह  विविध क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा