You are currently viewing ऊस शेतकऱ्याला वाचवण्यासाठी कारखानदारीला हात देणार – मनीष दळवी

ऊस शेतकऱ्याला वाचवण्यासाठी कारखानदारीला हात देणार – मनीष दळवी

चौथ्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी शेतकऱ्यांना आश्वासन

ओरोस

उस पीक शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तर तेथील कारखानदारीला आपण हात दिला पाहिजे. आपला केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. आणि आम्ही शेतकरी केंद्र बिंदू मानून काम करतो. जिल्हा बँकेचे कारखान्यामधील फायनान्स मधलं जे यश आहे ते त्यामुळेच आहे. आम्ही पक्ष.. नेता कोण.. नेतृत्व कोणाचे आहे ते नबघता तिथला उत्पादक किती अडचणीत आहे ते बघतो. शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर तेथील कारखानदारीला आपण हात दिला पाहिजे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील अथर्व इंटर ट्रेड प्रा. लि. लिज्ड दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी केले.

या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे अशोक जाधव, सचिव विजय मराठे तसेच प.स.चे माजी सभापती शांताराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष माळवीकर, प्रा.एन एस पाटील आदी मान्यवर तसेच शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनिष दळवी म्हणाले ज्या कारखान्याला आम्ही कर्ज देतो तो कारखाना री पेमेंट चांगलं करणार असतो. मॅनेजमेंट मध्ये जर शिस्त असेल तर तेथे चांगले परिणाम भविष्यात पाहावयास मिळतात. आशिया खंडात दौलत साखर कारखान्याचा पूर्वी दबदबा होता तसाच पूर्वीचा नावलौकिक पुन्हा मिळेल. कारखान दारीत आर्थिक शिस्त महत्त्वाची असते शेतकऱ्याचा उतारा वाढला पाहिजे त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून विचार जो करतो त्यांना शेतकऱ्याचे आशीर्वाद मिळतात या भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी विकासासाठी, कारखानदारांच्या विश्वासावर पतपुरवठा करावा लागणार आहे असे शेवटी मनीष दळवी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =