सावंतवाडी मळेवाड गुळदुवे मार्गे आरोंदा भटपवणी दुपारी 2 ची एसटी सुरू करण्याची केली होती मागणी काल पासून करण्यात आली सुरू
मनसेच्या वतीने सावंतवाडी आगारप्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे दुपारी दोनची सावंतवाडी मळेवाड गुळदुवे मार्गे आरोंदा भटपवणी एसटी सुरू करण्याची केली होती. मागील करोना काळापासून दोन वर्ष ही बस सेवा बंद करण्यात आली होती. पण शाळा कॉलेज सुरू होऊनही सावंतवाडी आरोंदा भटपवणी एसटी अद्यापही सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे नाहक हाल होत होते. तसेच प्रवाशांचेही सदर बाब मनसेचे पदाधिकारी राजेश मामलेकर यांच्या लक्षात येताच शहरअध्यक्ष आशिष सुभेदार यांच्याशी संपर्क केला व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुख श्री बोधे यांची भेट घेत सदर एसटी सुरू करण्याबाबत लेखी निवेदन सादर करण्यात आले. त्याची दखल घेत कालपासून सदर एसटी बस सुरू करण्यात आली. आगारप्रमुख श्री बोधे यांचे मनसे कडून आभार तसेच सदर एसटी सुरू झाल्यानंतर काल मनसेच्यावतीने चालक व वाहक यांचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देत स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गाकडून व प्रवाशांकडून सदर एसटी सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी म.न.लॉ.से तालुकाअध्यक्ष राजेश मामलेकर
निलेश मामलेकर संतोष सावंत सूयोग शेटकर समीर धणें लतेश जोशी चैतन्य जोशी नंदकीशोर शेटकर तूषार शेटकर वर्षा शेटकर आदी उपस्थित होते.