You are currently viewing प्रदेश भाजपाच्या निर्णयातून कायमस्वरूपी कामाचा ठसा जनतेमध्ये उमटवण्यासाठी कटिबध्द व्हा!….

प्रदेश भाजपाच्या निर्णयातून कायमस्वरूपी कामाचा ठसा जनतेमध्ये उमटवण्यासाठी कटिबध्द व्हा!….

भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांचे रत्नागिरी जिल्हा बैठकीत मार्गदर्शन

रत्नागिरी

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत घेतलेले निर्णय हे तळागाळातील जनतेच्या हिताचा विचार करून घेतलेले आहेत. यातून सर्वसामान्य जनतेशी पक्षाची असलेली नाळ अधिकच मजबूत होणार आहे. कार्यकर्त्यांनी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाच्या लोकप्रतिनिधींमध्ये वाढ होण्यापासून कोणीच पक्षाला अडवू शकणार नाही.या निर्णयाची समाजाच्या सर्व स्तरात पोहोचून अंमलबजावणी करण्यासाठी आणि या जिल्ह्यातील जनतेमध्ये कायमस्वरुपी कामांचा ठसा उमटविण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी पूर्णत्वास न्यावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश भाजपा सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले. भारतीय जनता पार्टी जिल्हा रत्नागिरी (उत्तर) जिल्हा कार्यकारणी बैठकीत ते बोलत होते.

आज चिपळुण येथे ब्राम्हण सहाय्यक संघात रत्नागिरी जिल्हा (उत्तर) कार्यकारिणीची विस्तृत बैठक प्रदेश सचिव श्री प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष विनय नातू आणि अन्य निमंत्रित सदस्यांसह पार पडली. दिनांक ८ ॲाक्टोबर रोजी झालेल्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत ठरलेल्या सर्व गोष्टींचा यात आढावा घेउन मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीत अनेक मुद्द्यांवर सर्वंकष चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षणाच्या बाबतीतली ठाकरे सरकारची निष्क्रीयता, किसान मोर्चाच्या माध्यमातुन शेतीमाल विधेयकाबाबत शेतकरी व ग्राहकांमध्ये करावयाची जनजागृती, महाराष्ट्र सरकारने अशा शेतकरी व ग्राहक हिताच्या या विधेयकाला स्थगिती दिल्याबद्दल निषेध नोंदविणे, युवा मोर्चाच्या माध्यमातुन आत्मनिर्भर भारत योजना तळागाळात राबविणे, शिक्षक आघाडीच्या वतीने नविन शिक्षण धोरण जनजागृती करणे, माजी सैनिक आघाडीच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षा व मा. पंतप्रधानांचे जागतीक कणखर नेतृत्व व राष्ट्रीय धोरणाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, महिला मोर्चाच्या माध्यमातुन ग्रामीण भागात बचत गटांचे संघटन करणे, वैद्यकीय आघाडीच्या माघ्यमातुन कोवीडकाळात जनतेसोबत राहणे, मंडलश: ई-बुक तयार करणे अशा प्रकारे अंमलबजावणी करावयाच्या कामांची चर्चा करण्यात आली. पक्षाच्या २२ आघाड्या व ७ मोर्चांच्या माध्यमातुन जिथे आजपर्यंत भाजपा पोहोचला नाही तिथपर्यंत भाजपा पोहोचविणे, घरोघर विविध योजनांचा लाभ मिळवून देणे व जनताभिमुख कामातून भविष्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाच्या लोकप्रतिनिधींमध्ये वाढ करुन जनतेमध्ये व जिल्ह्यात कायमस्वरुपी कामांचा ठसा उमटविण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. यासाठी मंडलश: कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग दिवाळी पुर्वी घेण्याचे निश्चित करण्यात आले. यासोबतच, पक्षाच्या ‘सरल पोर्टल’ची माहिती सर्वांना देऊन कार्यकारणी बैठकीचा समारोप करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा