You are currently viewing तोंडवली ईस्वलकरवाडी रोडवर चालत्या दुचाकीने घेतला पेट

तोंडवली ईस्वलकरवाडी रोडवर चालत्या दुचाकीने घेतला पेट

कणकवली

कणकवली तालुक्यातील तोंडवली ईस्वलकरवाडी रोडवर चालत्या दुचाकीने पेट घेतला.पाण्याने विझविण्याचा प्रयत्न केला असता आग अधिक भडकून दुचाकी जळून खाक झाली. सदरचा घटना दुपारी १:३० च्या सुमारास घडली.

नांदगाव येथून फोंडाघाटकडे मार्गावरून ईस्वलकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून समिर सदानंद ईस्वलकर, रा.तोंडवली, ईस्वलकरवाडी हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन घरी जात असताना असताना तोंडवली काॅलेज नजीक आले असता त्याच्या दुचाकीमधून मागच्या बाजूने धूर आल्याचे दिसल्याने त्यानी प्रसंगावधान बाळगून गाडी स्टॅन्डवर लावून पाणी घेण्यासाठी बाजूला गेले असताना गाडीने अचानक पेट घेतला.विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्ररूप धारण करून बघता बघता दुचाकी जळून खाक झाली. यावेळी स्थानिकांनी मदतकार्य करीत गाडी विझवली तर दैव बलवत्तर म्हणून दुचाकी स्वार प्रसंगातून बाळगून गाडीवरून खाली उतरल्याने मोठी जीवितहानी टळली.सदर दुचाकीत,शाॅर्टसर्कीट झाल्याने गाडी जळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा