You are currently viewing भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वजराठ येथील ग्रामदैवत श्री.देव गिरेश्वर मंदिरात अभिषेक व धार्मिक कार्यक्रम

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वजराठ येथील ग्रामदैवत श्री.देव गिरेश्वर मंदिरात अभिषेक व धार्मिक कार्यक्रम

वेंगुर्ले

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील बारा जोतीर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकाल मंदिराच्या परीसराचा सुशोभिकरण आणि सुविधा या कामांचा शुभारंभ केला. हा सोहळा संपुर्ण देशभरात भाजपा कार्यकर्त्यांनी उस्ताहात साजरा केला .
महाराष्ट्रातही प्रदेश नेतृत्वाने हा सोहळा प्रत्येक मंडळातील शंकराच्या देवळात पींडीवर अभिषेक करुन भक्तीमय वातावरणात साजरा करण्याचे ठरवले .
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वजराठ येथील ग्रामदैवत श्री देव गिरोबा मंदिरातही अशाच पद्धतीने कार्यक्रम करण्यात आला . यावेळी वजराठ गावातील प्रथम मानकरी सूर्यकांत परब यांच्या हस्ते बेलपत्राने अभिषेक करण्यात आला , तसेच सर्व ग्रामस्थांना पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे हिंदू धर्मासाठी करत असलेल्या कामाची माहिती देण्यात आली .
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , महिला मोर्चा अध्यक्षा सौ स्मिता दामले , ता.चिटणीस नितीन चव्हाण , वजराठ उपसरपंच नितीन परब , ता.उपाध्यक्ष संतोष गावडे , बुथप्रमुख वसंत परब , रविंद्र शिरसाठ , वामन भोसले , विकास चव्हाण , मेघशाम परब , उदय सोंसुरकर , गणपत परब , दशरथ वजराटकर , बाळू राणे , संजय राणे , चंद्रकांत राणे व वजराट ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + ten =