You are currently viewing इतर मागासवर्गीय  महामंडळाच्या लाभार्थीनी एकरकमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा

इतर मागासवर्गीय  महामंडळाच्या लाभार्थीनी एकरकमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी

इतर मागासवर्गीय (ओबीसी) महामंडळाच्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थीसाठी महामंडळाकडून एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार महामंडळाकडून घेतलेल्या योजनांतर्गत असलेल्या थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्यात येईल.

            लाभार्थीने कर्ज खाते बंद केल्यावर महामंडळाच्या रुपये 10 टक्के लक्ष कर्ज व्याज परतावा योजनेतंर्गत तसेच विविध महामंडळाच्या योजनांचा लाभ घेता येईल. तरी संबंधितांनी कर्ज खातेधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करावी व आपले कर्ज खाते बंद करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय येथे 02362-2288119, 8668898950 या दूरध्वनी क्रमांवर संपर्क करावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रिती आर पटेल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा