You are currently viewing अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीचे मिशन आयएएस

अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीचे मिशन आयएएस

दुसऱ्या वर्गापासून कलेक्टर होण्याचे प्रशिक्षण : दोन मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजन

महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रशासनात जावीत यासाठी परतीच्या अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख अकादमीने मिशन आयएएस व लातूर येथील संस्कृत संस्कार प्रकाशन जूनियर आयएएस परीक्षा हा उपक्रम गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर सुरू केलेला आहे .केवळ नाममात्र एक रुपयाचे शुल्क घेऊन त्यामध्येच पुस्तकांचे विनामूल्य वितरण करण्यात येते .या परीक्षेचा परीक्षा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे पेपर तपासणे त्यांना गुणपत्रिका व प्रमाणपत्र देणे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे .डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी मिशन आयएस अंतर्गत संस्कार प्रकाशनाच्या माध्यमातून हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही राबवते .या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात असून हे सर्व विद्यार्थी येत्या दोन मे रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रावरून ही परीक्षा देणार आहेत. शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेचा संस्कार मुलांमध्ये रुजू व्हावा यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गाची स्पर्धा परीक्षेची पुस्तके विनामूल्य देण्यात येतात .अमरावतीची डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ही भारतातील नामवंत संस्था असून या संस्थेला आतापर्यंत 350 आय ए एस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत .संस्थेने आतापर्यंत संपूर्ण भारतात 15000 विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतलेल्या आहेत ..या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पालकांनी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अधिक माहितीसाठी डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 98 90 96 70 03 या क्रमांकावर संपर्क साधावा. उच्च शिक्षणमंत्री श्री उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड या दोघांनीही या अभिनव उपक्रमाची पाठराखण केली असून प्रत्येक महाविद्यालयांमध्ये करियर कट्टा व प्रत्येक शाळेमध्ये मिशन आयएएस प्रारंभ करण्यासाठी त्यांनी रितसर पत्र काढून या उपक्रमाची प्रशंसा केलेली आहे .महाराष्ट्रातील शाळा आणि महाविद्यालयात बरोबरच हा उपक्रम गुजरात आणि राजस्थान या राज्यातही प्रारंभ झालेला आहे .तेथे देखील नाम मात्र एक रुपया एवढे अल्प शुल्क आकारण्यात येते .एक रुपयामध्ये स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण एवढ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतात देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी सारखी दुसरी संस्था दोन तरी उपलब्ध नाही .. विशेष म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची कलेक्टर होण्यासाठी जी परीक्षा द्यावी लागते त्या परीक्षेची तयारी या संस्थेमध्ये दिल्लीच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य करून देण्यात येते .या संस्थेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री उद्धव ठाकरे साहेब यांचे प्रधान सचिव मा. श्री विकास खारगे आय ए एस यांनी तेवीस वर्षापूर्वी म्हणजे बारा मे 2000 या तारखेला अमरावतीच्या विदर्भ युथ वेल फेअर सोसायटीच्या दंत महाविद्यालयात केलेले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रमध्ये मिशनआय ए एस या उपक्रमाची चर्चा असून सर्व जिल्ह्यातून या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद प्राप्त होत आहे .प्रकाशनार्थ .प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती 9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा