You are currently viewing ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानासाठी दोडामार्गात उद्या तालुकास्तरीय कार्यशाळा

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानासाठी दोडामार्गात उद्या तालुकास्तरीय कार्यशाळा

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानासाठी दोडामार्गात उद्या तालुकास्तरीय कार्यशाळा

ग्रामस्तरावर आरोग्यविषयक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकसहभाग वाढविण्यावर होणार मार्गदर्शन; महालक्ष्मी सभागृहात आयोजन

दोडामार्ग :

गावागावांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करून लोकसहभागातून आरोग्यदायी आणि संपन्न गावांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत उद्या, गुरुवार दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा सकाळी १०.३० वाजता दोडामार्ग येथील पंचायत समितीच्या महालक्ष्मी सभागृहात होणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संदर्भीय मार्गदर्शनानुसार पंचायत समिती दोडामार्ग आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा