सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे समुउपदेशिका श्रीमती अदिती कशाळीकर यांनी मानसिक तणावाची कारणे, शिक्षण, भविष्य , नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी तणाव या बद्दल माहिती देत, समुउपदेशांबाबत मार्गदर्शन केले आहे. यावेळी अपघातानंतर, व खराब जीवन शैली मुळे येणारे नैराश्य, तसेच मानसिक आरोग्य समस्या म्हणजे नैराश्य, चिंता विकार, स्मृतिभ्ंश, सिझोफ्रेनिया, इत्यादी आजाराबाबत कशा प्रकारे रुग्णालयात निदान केले जाते, व त्यानंतर उपचारा व्यतिरिक्त अशा रुग्णांचे समुपदेशन केले जाते, याची माहिती दिली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दुर्भाटकर यांनी देखील मार्गदर्शन केले.
लोकांची मानसिक आरोग्य विषयी जागरूकता वाढली असली तरी अजून ही बरेच लोक उपचार घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. तरी अशा रुग्णांनी न घाबरता आपल्या समस्या मांडाव्यात जेणेकरून त्यावर वेळेत निदान करून उपचार व समुपदेशन करता येईल , असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.