You are currently viewing देवीची ओटी आणि अलंकार

देवीची ओटी आणि अलंकार

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री स्मिता कुलकर्णी – ढोनसळे लिखीत अप्रतीम अभंग रचना*

*देवीची ओटी आणि अलंकार*

आई जगदंबे । त्रिकाळ स्मरते ॥
सेवा ही करते । अभंगात ॥१॥

करते साधना । नित्य आराधना ॥
आले मी दर्शना । दारी तुझ्या ॥२

रुप सजलेले । मुखाने वर्णूनी ॥
लेकरू मानुनी । घे जवळी ॥३

मुकूट सोन्याचा । माथ्याला साजरा ॥
कुंतली गजरा । शोभे तुज ॥४

भाळी शोभे टिळा । कुंकवाचा लाल॥
रूप खुललेल । मुखावर ॥ ५

कर्णफुले कानी । नाकात झुलते ॥
नथनी खुलते। अंबे तुला ॥६

कोल्हापुरी साज । गळ्यात सजतो ॥
हार विराजतो । मूर्तीवर ॥ ७

बाजूबंद वाकी । बिलवर ,तोडे ॥
काकणात जोडे । हातामध्ये ॥८

कंबरेचा पट्टा । हिरे माणकांचा ॥
रत्नजडितांचा ॥ मनोहर ॥९

पायात पैंजण । जोडवे बिछवे॥
पाहत राहावे। रुप तुझे ॥१०

भरजरी शालू । माझ्या अंबिकेला ॥
जगदंबिकेला । शोभा देई ॥ ११

ओठावरी हास्य । सुगंधित कांती ॥
आयुधे गं हाती । तेजस्विनी ॥१२

ओटीसाठी तुला । खण नारळाला ॥
सुपारी फळाला । केला साज ॥१३

स्मिता म्हणे तुला । आले दर्शनाला ॥
दारी पुजनाला । आई तुझ्या॥ १४

स्मिता कुलकर्णी- ढोनसळे

Advertisement

🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

*Advt link*

प्रतिक्रिया व्यक्त करा