*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ मोनिका बासरकर – कुलकर्णी लिखीत अप्रतिम लेख*
*वनवास- आधुनिक सीतेचा*
आज काल च्या आधुनिक काळात स्त्री आणि पुरुष दोघांना बरोबरीचे स्थान आहे. पण तरी सुद्धा थोड्याबहु प्रमाणात आजही स्त्रीच्या आयुष्यातला वनवास संपलेला नाहीये. आजही स्त्रीवर अनेक प्रकारे अत्याचार होतोच.बलात्कार , घरगुती हिंसा’,वाईट नजरा , मानसिक छळ अशा असंख्यरूपी अन्यायाचे रावण आजही तिच्या आसपास भटकतच आहेत .
आपल्या सभोवती समाजात वावरताना काही सामाजिक रचना केल्या आहेत ,काही सामाजिक रूढी-परंपरा घालुन दिलेल्या आहेत . त्या स्त्री आणि पुरुष ह्या दोघांसाठी समान आहेत तरीही स्त्रियांचे हक्क आणि पुरुषांचे हक्क यामध्ये नेहमी भेद-भाव केला जातो. आधुनिक काळातसुद्धा अनेक स्त्रियांना स्वतःच्या हक्कांसाठी लढावे लागते. अजूनही काही स्त्रिया शिक्षणापासुन वंचित आहेत. शिक्षणाअभावी तिला स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवावी लागतात . काही ठिकाणी ,काही घरांमध्ये आजसुद्धा स्त्रियांवर शारीरिक अत्याचार केले जातात , अमानुषपणे त्यांचा छळ केला जातो आणि काही स्त्रिया ह्यांमुळे बळी जातात . खेदाची बाब म्हणजे अशी कि शहरांमध्ये अगदी काही सुशिक्षित घरांमध्येसुद्धा हे चित्र आढळून येतं . छळ हा फक्त शारीरिक नसतो , काही जखमा ह्या शरीरावर नसतात तर खोलवर मनाला लागलेल्या असतात .
आपण बऱ्याच वेळा पाहतो घरामध्ये एखादा सण अथवा काही कार्य असेल तर स्त्रिया तत्परतेने अगदी कंबर कसून उभ्या असतात . कार्य सिद्धीस कसे जाईल ह्यासाठी प्रयत्न करत असतात . बऱ्याच वेळी स्त्रियांना अडचणी सुद्धा येतात पण त्यांकडे दुर्लक्ष करून त्या स्वतःला कामांत गुंतवून घेतात . कार्यक्रमामध्ये आपल्यामुळे कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून पाळीच्या गोळ्या घेऊन पाळी पुढे /मागे ढकलणाऱ्या स्त्रिया आजही आहेत .होणाऱ्या परिणामांचा विचार न करता त्या कार्य करत राहतात. स्वतःच्या कुटुंबासाठी ती सतत झटत असते , तिला जसे जमेल तसं ती प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते तरीसुद्धा तिच्या माथी कायम दुजाभाव , तुलना , टोचणी येतच असते . स्वतःचं अस्तित्व विसरून इतरांचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या स्त्रीच्या वाट्यावर कायम दुःखच येतं. घरात २४ तास राबणाऱ्या गृहिणीला “तुला काय काम असतं?” हेच ऐकावं लागतं .
जेव्हा एखादी स्त्री कुठल्याही कारणामुळे घराबाहेर पडते-आज स्त्रिया शिक्षणासाठी कामासाठी व नोकरीसाठी बाहेर पडतात. तिथे सुद्धा त्यांना पाहिजे तसा आदर मिळत नाही . आजच्या काळात स्त्री व पुरुष दोघे म्हणून कुठल्याही क्षेत्रात काम करताना दिसतात.तेथे फक्त पुरुषांनाच सन्मानित केले जाते व स्त्रियांच्या कर्तुत्वाकडे दुर्लक्ष केले जाते . बाहेर वावरत असताना होणारे अन्याय तर वेगळेच. वर्तमानपत्रात तर आपण रोजच वाचतो विनयभंग , बलात्कार , ऍसिड हल्ला -अशा असंख्य अडचणींना कायम फक्त स्त्रीला सामोरे जावं लागतं .
थोडक्यात काय तर स्त्री पाहिजे तशी सुरक्षित नाहीये. ना घरात,ना घराबाहेर . असाच आहे तिचा “आधुनिक युगातील सीतेचा न संपलेला वनवास ” !
मोनिका बासरकर
मुंबई
Advertisement
*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃
*💁♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔
*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*
*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*
*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*
*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘
*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️
*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*
🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*
*ऑफिस नं. 9637163129*
*Web link*