You are currently viewing 23 ऑक्टोंबरला सावंतवाडीत नरकासुर स्पर्धेचे आयोजन

23 ऑक्टोंबरला सावंतवाडीत नरकासुर स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी:

 

सावंतवाडी येथे रविवारी 23 ऑक्टोंबर ला शिवतेज मित्र मंडळाच्या माध्यमातून दीपावली निमित्त नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मोती तलावाच्या काठी ही स्पर्धा रात्री नऊ वाजता घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 11 हजार 111, द्वितीय 7 हजार 777, तृतीय 5 हजार 555 व उत्तेजनार्थ दोन पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी आपली नावे लवकरात लवकर नोंदवावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विशाल सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + three =