You are currently viewing उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर चिन्ह ‘मशाल’

उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर चिन्ह ‘मशाल’

तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव परंतु अद्याप कोणतेही चिन्ह मिळालं नाही

 

मुंबई:

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्या नंतर आणि शिवसेना नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज अखेर निवडणूक आयोगाने याबद्दलचा निर्णय दिला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव देण्यात आले आहे. यासोबतच एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे. परंतु अद्याप शिंदे गटाला कोणतेही चिन्ह मिळालं नाहीये. आयोगाकडून नवीन तीन चिन्हे सूचवा असे शिंदे गटाला सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा