You are currently viewing सातरल – कासरल असरोंडी मार्गावरील शालेय बस फेऱ्या नियोजित वेळेत येणेबाबत

सातरल – कासरल असरोंडी मार्गावरील शालेय बस फेऱ्या नियोजित वेळेत येणेबाबत

मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली कणकवली आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर

कणकवली

माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी या प्रशालेत इयत्ता ५ ते १० चे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु एस.टी. बस सेवा नियोजित वेळेत सुरू नसल्यामुळे तसेच बऱ्याच वेळा बसफेऱ्या अचानक रद्द केल्या जातात त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एस.टी .बस वेळेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ६ ते ८ किमी शाळेत चालत यावे लागते किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
सकाळी ८.१५ वाजता सुटणारी कणकवली ते किर्लोस सकाळी १०c वा.सुटणारी कणकवली ते असंगणी व सायंकाळी ४ वा. सुटणारी कणकवली ते किर्लोस सदरच्या बस फेऱ्या नियोजित वेळेत सोडणे आवश्यक आहे .
वरील बाबींचा सहानुभूती पूर्वक विचार करून विद्यार्थ्यांसाठी नियोजित वेळेत बसफेऱ्या पाठवाव्यात. आपण निश्चितपणे योग्य आणि तात्काळ निर्णय घ्या अशा आशयाचे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष दया मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली कणकवली आगार व्यवस्थापकांना दिले आहे. यावेळी मुख्याध्यापक पाटील सर, सानरल सरपंच प्रदीप राणे, कासरल पोलीस पाटील राजू सावंत, अनिल सावंत, पालक संदीप श्रावणकर, अमित सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा