You are currently viewing वेंगुर्लेतील आरवली श्री देव वेतोबा देवस्थानला “आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” प्राप्त

वेंगुर्लेतील आरवली श्री देव वेतोबा देवस्थानला “आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” प्राप्त

वेंगुर्ले :

 

वेंगुर्ले तालुक्यातील आरवली श्री देव वेतोबा देवस्थानला देवस्थानच्या धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री.जयवंत राय यांनी हा पुरस्कार स्विकारला.

नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगाव व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी तर्फे आंतरराज्य पुरस्कार वितरण समिती बेळगाव तर्फे बेळगाव येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष जयवंत राय यांच्यासह देवस्थान कमिटीचे विश्वस्त डॉ.प्रसाद साळगावकर, सेक्रेटरी आबा टाककर, सामाजिक कार्यकर्ते मयूर आरोलकर, पोलिस पाटील मधुसूदन मेस्त्री आदी उपस्थित होते.

कर्नाटक माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, बेळगाव माजी खासदार अमरसिंह पाटील, गुलबर्गा जिल्हा पोलिस प्रमुख महेश मेघणावर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सन्मान पूर्वक देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =