सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सावंतवाडी शाखेचा विद्यार्थी गुणगौरव,आणि समाजातील उल्लेखनीय कार्य आणि सेवा निवृत्त आणि बढती मिळालेल्या आणि पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा उत्साहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कळसुलकर शाळेच्या हॉल मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा साठी उदघाटक सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, माजी जिल्हाध्यक्ष अनिल निरवडेकर,तालुका अध्यक्ष गणेश म्हापणकर,पशुधन विकास अधिकारी डॉ.शरद जाधव,कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण,स्टेट बँकेचे प्रबंधक लक्ष्मण सरंबळकर,जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर,चंद्रसेन पाताडे, लवू चव्हाण,बाबुराव चव्हाण,अभियंता विजय चव्हाण,कल्याण कदम,सुषमा चव्हाण,प्राध्यापक सूर्यकांत लोखंडे करिअर कोच आणि माईंड ट्रेनर सीईओ, अनंत ओटवणेकर,परशुराम चव्हाण,तानाजी वाडकर,ओमप्रकाश तीवरेकर,दिलीप इन्सुलकर,भारत बांदेकर,जगदीश चव्हाण तसेच समाजबांधव,विद्यार्थी,सत्कारमूर्ती आदी उपस्थित होते.यावेळी दहावी,बारावी,पदवी,पदविका,अभियंता,वैद्यकीय सेवा परीक्षा,बी टेक,एम टेक,औषध निर्माता,अशा विविध अभ्यासक्रमात प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सातवी तील अथर्व दाभोलकर,पणदुर या विद्यार्थ्याने डोळ्याला पट्टी बांधून वाचन करण्याची किंवा वस्तू ओळखण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.यावेळी सेवा निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच विविध विभागात बढती आणि नियुक्ती झालेल्या अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला.तसेच समाजातील विविध पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा अध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष आणि मान्यवरांचा देखील सत्कार सोहळा झाला.यावेळी जिल्हास्तरीय समाज भूषण पुरस्कार प्राप्त सावंतवाडी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सौ.संजना चव्हाण या उभयतांचा सत्कार जिल्हाध्यक्ष सुजित जाधव आणि अनिल निरवडेकर,गणेश म्हापण कर यांच्या हस्ते करण्यात आला.