You are currently viewing ”फाडफाड कोकाटे इंग्लिश” चे प्रणेते डॉ. महादेव कोकाटे यांची ”अक्षरघराला” भेट

”फाडफाड कोकाटे इंग्लिश” चे प्रणेते डॉ. महादेव कोकाटे यांची ”अक्षरघराला” भेट

कणकवली

फाडफाड कोकाटे इंग्लिश अशी ओळख असणारे, आपला मराठी तरुण इंग्रजी बोलला पाहिजे यासाठी गेली 40 वर्षे सातत्याने काम करणारे आणि कोकाटे स्पिकिंग इंग्लिश या स्वत:च्या इंग्लीश तंत्राचे संशोधक डॉ. महादेव कोकाटे यांनी अलिकडेच आमच्या अक्षरघराला सदिच्छा भेट दिली. डॉ. महादेव कोकाटे हे मुळचे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वारगाव (ता. कणकवली) येथील असुन त्यांनी आपल्या इंग्लिशच्या वेगळ्या तंत्रामुळे अनेक राजकिय मंडळी, मोठमोठे अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक यांना इंग्रजी बोलायला शिकविले. 100 टक्के इंग्रजी बोलायला शिकवणारे हे तंत्र आपणही अवगत करुन घ्यायला काहीही हरकत नाही.

त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त एक तासाचा स्पिकिंग इंग्लिशचा कोर्स. त्यात पहिल्या अर्ध्या तासात मोफत बोलण्याची इंग्लिश शिकून 50 टक्के इंग्लिश बोलता आले नाही तर पाच हजाराचे बक्षिस… पुढच्या अर्ध्या तासात तुम्ही इंग्रजी बोलायला शिकून जग जिंकायला तयार व्हाल. यशाची खात्री आजपर्यंतचे त्यांचे अनेक अधिकारी, राजकिय मंडळी आणि इतर विद्यार्थी स्वानुभवातून देतात.

अनेक इंग्रजी पुस्तकाचे लेखक आणि स्वत: विकसित केलेल्या इंग्रजी तंत्राचे संशोधक डॉ. महादेव कोकाटे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी 98216 04188 किंवा 95886 41225 यावर जरुर संपर्क साधा.

अक्षरघराला यांनी दिल्या भेटी
तळेरे येथील अनोखी संकल्पना असलेल्या अक्षरघराला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू जयेश राणे, अभिनेते, दिग्दर्शक संजय खापरे, दिग्दर्शक दिपक कदम, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी, साहित्यिक, कथाकथनकार वृंदा कान्बळी, आंतररष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नेमबाज रोहिणी हवालदार, कवी प्रा. प्रदिप पाटिल, ज्येष्ठ विचारवंत वैजनाथ महाजन, आंतरराष्ट्रीय कामगार नेते विद्याधर राणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, अभिनेत्री प्राजक्ता वाडये, इस्लामपुरचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे, चित्रकार राज शिंगे, सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे, पर्यावरण अभ्यासक- लेखक धीरज वाटेकर, जीवन प्रबोधनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर, महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे विजय घरत, घुंगुरकाठीचे संस्थापक सतिश आणि सौ. सई लळीत, माजी राज्यपालांचे सहसचिव प्रा. विनायक दळवी यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी भेट देऊन अक्षरघराचे कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा