You are currently viewing वामनराव महाडीक विद्यालयाला ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार

वामनराव महाडीक विद्यालयाला ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार

तळेरे हायस्कूलला ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य, आणि विज्ञान महाविद्यालय तळेरेला सन २०२१-२२ चा ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ नुकताच जाहीर करण्यात आला.
जि. प. सिंधुदुर्ग यांच्यातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी मान. प्रजित नायर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मान. महेश धोत्रे , माध्यमिक शिक्षणाधिकारी मान. डॉ. मुश्ताक शेख यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र पंचायत समितीचे सचिन तांबे , कुरुंगावणे खैराटवाडी शाळा नं. १ चे मुख्याध्यापक श्रीपाद बागडी यांचे मार्फत विद्यालयाला सुपूर्त करण्यात आले.
‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी’ सन २०२१-२२ मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार तालुक्यातील १३ शाळांची निवड यासाठी करण्यात आली. यामध्ये तळेरे हायस्कूलला फाइव्ह स्टार मानांकनासह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शाळा समिती सदस्य प्रवीण वरूणकर, शरद वायंगणकर,प्राचार्य अविनाश मांजरेकर, ज्येष्ठ शिक्षक सी. व्ही. काटे, डी.सी.तळेकर, एन. बी. तडवी, पी. एम. पाटील, पी. एन. काणेकर, प्राध्यापिका ए. बी. कानकेकर, ए.पी. कोकरे, एन.पी. गावठे, व्ही.डी. टाकळे , ए. बी. तांबे, एस. यु. सुर्वे , एस. एन. जाधव , शिक्षकेतर कर्मचारी ज्येष्ठ लिपिक आर.जी. तांबे, के.डी. तळेकर , प्रकाश घाडी , देवेंद्र तळेकर , संदेश तळेकर ,विद्यार्थी प्रतिनिधी विराज नांदलस्कर , विद्यार्थिनी प्रतिनिधी मिताली चव्हाण , स्वच्छता मंत्री अथर्व तळेकर तसेच संपूर्ण शालेय मंत्रिमंडळ , वर्ग प्रतिनिधी , विद्यार्थी आदी उपस्थित होते .


विद्यालयाला मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर , चेअरमन अरविंद महाडीक , दिलीप तळेकर , प्रवीण वरूणकर , शरद वायंगणकर , संतोष जठार , संतोष तळेकर , उमेश कदम , निलेश सोरप , विद्यार्थी , पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा