You are currently viewing नानाभाऊ पटोलेंचा वाढदिवस वेंगुर्ला तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीतर्फे शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा

नानाभाऊ पटोलेंचा वाढदिवस वेंगुर्ला तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीतर्फे शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लोकनेते नानाभाऊ पटोले यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. शेती व शेतकऱ्यांप्रती तळमळीने काम करणाऱ्या नानभाऊंचा आज 5 जून रोजी वाढदिवस शेतकरी सन्मान दिवस म्हणून वेंगुर्ला तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीतर्फे साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांना काजू व नारळ रोपे तसेच खते वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष श्री विधाता सावंत, ओ. बी.सी. सेल चे जिल्हाध्यक्ष श्री जगन्नाथ डोंगरे, शहर अध्यक्ष गटनेते श्री प्रकाश डीचोलकर, महिला शहर अध्यक्ष नगरसेविका सौ कृतिका कुबल, नगरसेवक श्री आत्माराम सोकटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा