सावंतवाडी
मुलांमध्ये वन्यजीवाविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन वनविभाग मार्फत करण्यात आले होते यातच एक भाग म्हणून पाट हायस्कूलमध्ये मुलांसाठी मार्गदर्शन वर्ग व चित्रकला स्पर्धांचा आयोजन करण्यात आले . इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलांनी यामध्ये सहभाग घेतला . विविध प्राण्यांची चित्रे मुलांनी रेखाटली यावेळी वनरक्षक श्री रोहित माईनकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले .
सापाविषयी गैरसमज .खवले मांजराचे जीवन चक्र . प्राण्यांची जीवन प्रणाली याविषयी मार्गदर्शन केले . स्वागत कलाशिक्षक श्री संदीप साळसकर यांनी केले यावेळी मुख्याध्यापक श्री शामराव कोरे पर्यवेक्षक श्री राजन हंजनकर व इतर शिक्षक उपस्थित होते. इयत्ता दहावीच्या गटात प्रथम क्रमांक कुमार ज्ञानेश्वर रावले द्वितीय क्रमांक दत्तराज ठाकूर तृतीय क्रमांक पार्थ गोसावी यांनी पटकावला तर प्राथमिक विभागात प्रथम क्रमांक कुमार मनीष चव्हाण द्वितीय क्रमांक दिया सामंत तृतीय क्रमांक चैतन्य कोळ बकर यांनी पटकावले या सर्वांचे आभार विद्यार्थ्यानीच मानले