You are currently viewing किशोरी पेडणेकर या मातोश्रीच्या रानू मंडला – प्रज्ञा ढवण

किशोरी पेडणेकर या मातोश्रीच्या रानू मंडला – प्रज्ञा ढवण

राणे यांच्यावर पातळी सोडून टीका करू नये…!

कणकवली

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या मातोश्रीच्या रानू मंडला म्हणून काम करत आहेत, असा आरोप भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण यांनी केला.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर मातोश्रीच्या परिसरातील असंतुष्ट आत्मा असून शिवसेनाही आपल्या उपजीविकेचे साधन असल्यामुळे पडत्या फळाची आज्ञा घेऊन मातोश्रीच्या रानू मंडला म्हणून काम पाहत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने यापूर्वी देखील किशोरी पेडणेकर स्टंट आणि नौटंकी एक वेळा पहिली आहे. खोटे खोटे रडणे, विचित्र कंठ काढून बोलणे, विचित्र चाली लाऊन गाणी म्हणणे असे विचित्र चाळे करून प्रसिद्धी मिळवणारी ही महिला आहे. मुंबई महानगरपालिकेत महापौर असताना त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला. त्याचप्रमाणे मातोश्रीची पहिली महिला कॅश कलेक्टर म्हणून काम पाहिले. किशोरी पेडणेकर आजही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आपली बहीण मानतात. त्यांची कौटुंबिक संबंध आजही तेवढेच आहेत, परंतु मातोश्रीला खुश करण्यासाठी आणि पुढील निवडणुकीत आपले तिकीट कापू नये यासाठी राणे यांच्यावर टीका करायची हा त्यांचा हेतू आहे. यापुढे राणे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यास तुमचे जनतेसमोर माहीत नसलेले विषय माहित करून देणार याचे भान ठेवावे, असा इशारा सौ. ढवण यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा