You are currently viewing कणकवलीत यंदाही दिवाळी विशेष बाजार भरणार – नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवलीत यंदाही दिवाळी विशेष बाजार भरणार – नगराध्यक्ष समीर नलावडे

आमदार नितेश राणेंच्या हस्ते १९ ऑक्टोबरला होणार उद्घाटन…

कणकवली

शहर आणि परिसरातील बचतगटांकडून तयार होणारा फराळ, तसेच विविध कलावंताकडून तयार होणाऱ्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी कणकवली शहरात यंदाही विशेष दिवाळी बाजार भरणार आहे. आमदार नीतेश राणे यांच्याहस्ते १९ ऑक्‍टोबरला सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याबाबतची माहिती आज नगराध्यक्ष दालनात दिली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे उपस्थित होते.
श्री.नलावडे म्‍हणाले, शहर आणि परिसरातील बचतगट मोठ्या प्रमाणावर दिवाळी फराळ करतात. तर शहरातील अनेक छोटे उद्योजक कंदील, पणत्‍या, उटणे आदी साहित्‍याची निर्मिती करतात. या उत्‍पादनांना एकाच छताखाली बाजारपेठ उपलब्‍ध व्हावी, यासाठी गतवर्षी शहरातील सेवा रस्त्यालगत स्वतंत्र दिवाळी बाजार भरवला होता. त्‍याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्‍याच धर्तीवर यंदा देखील दिवाळी बाजार भरणार आहे. या बाजाराचे उद्‌घाटन आमदार नीतेश राणे यांच्याहस्ते १९ ऑक्‍टोबरला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. तर २३ ऑक्‍टोबर पर्यंत हा दिवाळी बाजार सुरू राहणार आहे.
श्री.नलावडे म्‍हणाले, गतवर्षी दिवाळी बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. बचतगटांच्या उत्‍पादनांनाही मागणी वाढती राहिली. तसेच अनेक स्थानिक कलावंतांच्या उत्‍पादनांना बाजारपेठ उपलब्‍ध झाली. त्‍यामुळे यंदाच्या दिवाळी बाजारात देखील दिवाळी फराळाबरोबरच बांबू च्या काठीपासून तयार केलेले कागदी आकाशकंदील, कुंभारांच्या हस्त कलेतील मातीचे कंदील, मातीचे दिवे, मातीचे शो पीस, इमिटेशन ज्वेलरी, चहा, सरबत स्टॉल असे एकूण ३५ स्टॉल असणार आहेत. या स्टॉलसाठी स्टॉल आणि लाईट व्यवस्था मोफत केली जाणार आहे. या स्टॉल साठी नगरसेविका मेघा गांगण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री.नलावडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 11 =