You are currently viewing महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांगवे भाजपच्यावतीने अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांगवे भाजपच्यावतीने अभिवादन

कणकवली

बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आंबेडकर यांच्या 64 वा महापरिनिर्वाण दिन आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला पं. स.-माजी सभापती सुरेश सावंत, माजी.जि. प.अध्यक्षा संजना सावंत तसेच भाजप चे जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुसूचित जाती भाजप मोर्चाचे कार्यकर्ते वरवडेकर यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगवे बौद्ध विकास मंडळाचे सचिव अशोक कांबळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांगवे बौद्ध विकास मंडळाचे कार्याध्यक्ष व सांगवे गावचे माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष चंद्ररतन कांबळे यांनी केले. सदर कार्यक्रमाला आंबेडकर नगरातील सर्व बंधुभगिनी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 6 =