You are currently viewing सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतले श्री भराडी देवीचे दर्शन

सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतले श्री भराडी देवीचे दर्शन

मालवण (मसुरे) :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यावर आज पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी आंगणेवाडी विकास मंडळ आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने मंत्री रवींद्र चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या समवेत भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

आंगणेवाडी मंदिर परिसरातील सर्व अंतर्गत रस्ते, पायवाटा तसेच आंगणेवाडीला जोडणारे सर्व मुख्य रस्ते खड्डेमुक्त व्हावेत. रस्ते मार्ग डांबरीकरण व नूतनीकरण व्हावेत, येथील नळपाणी योजना कार्यान्वीत व्हावी. नवीन जलस्रोत निर्माण व्हावेत. याठिकाणी भाविकांसाठी प्रशस्थ असे सुलभ शौचालय उभारणी व्हावी यासह अन्य मागण्या ग्रामस्थांच्या वतीने मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. आंगणेवाडीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्द असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली आहे.

यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, बाळा आंगणे, काका आंगणे, अनंत आंगणे, बाबू आंगणे, जयंत आंगणे, दिनेश आंगणे, प्रसाद आंगणे, रघुनाथ आंगणे, दत्ता आंगणे, गणेश आंगणे, नंदू आंगणे, किशोर आंगणे, समीर आंगणे यासह अन्य ग्रामस्थ तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत, निलेश तेंडुलकर, सरोज परब, महेश मांजरेकर, विकी तोरसकर, विजय केनवडेकर, दीपक पाटकर, महेश बागवे, राजू बिड्ये, राजू प्रभुदेसाई, विक्रांत नाईक, हरीश गावकर, सौरभ ताम्हणकर, फ्रान्सिस फर्नांडीस यासह बांधकाम विभागाच्या अधिकारी अनामिका जाधव, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, पोलीस निरीक्षक विजय यादव यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा