You are currently viewing परुळे गौतमनगर येथे धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा

परुळे गौतमनगर येथे धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा

वेंगुर्ला :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परुळे गौतमनगर येथे बुधवार दि. ५ ऑक्टबर २०२२ रोजी सकाळी ११ वा. “धम्मचक्रप्रवर्तन दिन” सोहळा आयु. संजय जगन्नाथ परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

या कार्यक्रमा निमित्त बुद्ध वंदना, त्रिसरण, पंचशिल भारतीय बौद्ध महासभा तालुका वेंगुर्ले बौद्धाचार्य राकेश वराडकर यांनी घेऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तसेच या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांच्या ही भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय परुळेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करणेत आला, दिप प्रज्वलन बौद्धाचार्य राकेश वराडकर यांच्या हस्ते करणेत आले.

कार्यक्रमामध्ये राकेश वराडकर यांनी मुलांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्त्यांनाही आंबेडकरी विचारांचे मार्गदर्शन केले. महेश परुळेकर यांनी बौद्धांचा इतिहास
सांगुन धम्म प्रवर्तन दिनाचे महत्व विशद केले. या कार्यक्रमासाठी निवती पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक श्री. राणे व त्यांच्या पोलिस प्रशासनाने सदिच्छा भेट देवून समाज बांधवांना या कार्यक्रमाबाबतचे महत्व विशद करून आंबेडकरी विचार स्विकारणेच आवाहन करणेत आले.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करणे यासाठी आर्थिक सहकार्य शांताराम पेडणेकर, सिद्धार्थ जाधव, महेश परुळेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते शिलवर्धन परुळेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी विलास गवई, आत्माराम परुळेकर, न्हानु परुळेकर, तुषार परुळेकर, जनार्दन परुळेकर, श्रीधर परुळेकर, संजय परुळेकर आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कल्पित परुळेकर व आभार संजय परुळेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा