कवी संजय गोरडे (सौभद्र) यांना साहित्य प्रेरणा पुरस्कार तर “अश्वमेघ प्रतिष्ठान” ला सामाजिक प्रेरणा पुरस्कार
चांदवडी रुपय्या साहित्य कलारसिक मंडळ दरवर्षी समाजातील कार्यशील घटकांचा सन्मान करत असते. ‘चांदवडी रूपय्या’ मंडळाच्या वतीने दर वर्षी दिले जाणारे यंदाचे पुरस्कार सचिव सागर जाधव जोपुळकर व अध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर जाहीर केले आहेत.
साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देत असलेले आणि ज्यांची प्रेरणा समाजातील इतर घटकांनी घ्यावी असे नाशिक येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, कामगार *कवी संजय गोरडे ( सौभद्र )* यांना “*चांदवडी रुपय्या साहित्य प्रेरणा पुरस्कार*”
तर सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा *अश्वमेध प्रतिष्ठान* या ग्रुपला त्यांनी डोंगरमाळावर वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करणे, कोरोना काळात रुग्णांना जेवण पुरवणे व इतर कार्याची दखल घेऊन त्यांना “चांदवडी रुपय्या सामाजिक प्रेरणा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्याचे ठरवले आहे.
पुरस्कारांचे स्वरूप स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे असणार आहे.
पुरस्कारांची निवड रवींद्र देवरे, डॉ राजेंद्र मलोसे, शीला पाटील, हर्षल गांगुर्डे, सविता दरेकर, संदीप गुजराथी, सोमनाथ पगार, जनार्दन देवरे, सुशीला संकलेचा व सविता दिवटे यांनी केली.
या प्रसंगी वंदना गांगुर्डे, वाल्मिक सोनवणे, बाळा पाडवी, डॉ तुषार चांदवडकर, शिवराज पाटील, देव हिरे, अजित अहिरे, रुपाली घमंडी, शैलजा जाधव, शांताराम हांडगे, प्रफुल्ल सोनवणे, अमर ठोंबरे, हेमांगी बर्वे, सुदीप गुजराथी, रितू जाधव, दिगंबर शेळके, रुपाली खैरणार आदींनी स्वागत व अभिनंदन केले.
पुरस्कार वितरण दीपावली दरम्यान होईल, असे चांदवडी रुपय्याचे अध्यक्ष रावसाहेब जाधव व सचिव सागर जाधव जोपुळकर यांनी सांगितले.