You are currently viewing महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य डॉ दत्तात्रय कोपरकर यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा प्रशासकीय पाया उत्तमरीतीने रचला – राजेसाहेब खेमसावंत भोंसले

महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य डॉ दत्तात्रय कोपरकर यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा प्रशासकीय पाया उत्तमरीतीने रचला – राजेसाहेब खेमसावंत भोंसले

सावंतवाडी

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य म्हणून डाॅ. दत्तात्रय कोपरकर यांनी प्रशासकीय पाया उत्तमरीतीने रचला. ते उत्कृष्ट प्राचार्य होते असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी केले .श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य डॉ दत्तात्रय गंगाधर कोपरकर यांच्या प्रतिमेचे अनावरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते .याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले ,कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले,युवराज्ञी सौ. श्रद्धा राजे भोंसले , प्राचार्य कोपरकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रा. जगन्नाथ कोपरकर , स्नुशा सौ .स्नेहल कोपरकर , नातु श्री समीर कोपरकर , सौ सुनीला कोपरकर ,श्री अमित कोपरकर, पणती कु.जान्हवी अमित कोपरकर , संस्थेचे संचालक प्रा. डी.टी. देसाई ,सहसंचालक अॅडव्होकेट श्यामराव सावंत , प्रमुख अतिथी प्रा. एम व्ही कुलकर्णी , प्राचार्य कोपरकर यांचे सहकारी प्रा. विजय फातर्पेकर ,सौ पद्मा फातर्पेकर , प्रा.ए. एल. घाडगे ,प्रा. सुभाष गोवेकर ,प्रा. विश्वास जोशी ,प्राचार्य कोपरकर यांचे विद्यार्थी श्री अन्वर खान ,सौ मीरा घारपुरे ,श्रीदत्तप्रसाद गोठोसकर ,अॅडव्होकेट श्री नकुल पार्सेकर ,अॅडव्होकेट प्रा. अरुण पणदूरकर ,प्रा. दिलीप गोडकर, श्री पंचम खेमराज लॉ कॉलेज च्या प्राचार्या सौ अश्विनी लेले, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल यांनी केले त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला लवकरच महाविद्यालय स्वायत्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कोपरकर कुटुंबियांकडून दिलेल्या प्राचार्य दत्तात्रय कोपरकर यांच्या प्रतिमेचे यावेळी अनावरण करण्यात आले .याप्रसंगी प्राचार्य कोपरकर यांचे सहकारी प्रा. विजय फातर्पेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले की कोपरकर हे सहकाऱ्यांना खूप मदत करायचे. विविध कार्यक्रमांसाठी प्रोत्साहन द्यायचे. ते अतिशय कडक शिस्तीचे तसेच मृदू स्वभावाचे होते. सौ पद्मा फातर्पेकर या त्यांच्या विद्यार्थिनी त्यांनी सांगितलं की विशेषतः मुलींना ते अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे .प्राध्यापक अन्वर खान यांनी सांगितले की प्राचार्य कोपरकर यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय छान होते, ते करारी होते , शिस्तीचे होते , त्यांचे संस्कृत,पाली अर्धमागधी जर्मन ,इंग्रजी मराठी हिंदी अशा भाषांवर प्रभुत्व होते , प्रा. ए . एल. घाडगे यांनी सांगितले की ते सहकारी प्राध्यापकाना खूप मदत करायचे अडीअडचणीला धावून यायचे . कोणत्याही प्राध्यापक कॉलेज सोडून जाणार नाही याची ते काळजी घ्यायचे .प्रा. एम व्ही कुलकर्णी यांनी सांगितले की ते आमच्यासाठी पित्या समान होते . सहकाऱ्यांशी ते अदबीने बोलायचे त्यांना सर्व गोष्टी समजावून सांगायचे .
याप्रसंगी महाविद्यालयाच्या गणित विभागाचे माजी प्राध्यापक एम पी कुलकर्णी यांनी आपली स्वर्गीय कन्या डॉ. मंजिरी मल्हार कुलकर्णी हिच्या स्मृतीप्रीत्यर्थ महाविद्यालयाला दहा हजार एक रुपयाची देणगी सुपूर्द केली .तसेच कोपरकर कुटूंबियांनी देखील महाविद्यालयासाठी दहा हजार रुपयाची देणगी दिली .
या कार्यक्रमामागची कोपरकर कुटुंबियांची भूमिका श्री.समीर कोपरकर यांनी मांडली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ डी जी बोर्डे यांनी केले तर आभार श्री अमित कोपरकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 11 =