You are currently viewing डीकेटीई संस्थेच्या संचालकपदी प्रकाश दत्तवाडे , चंद्रशेखर शहा निवडीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार

डीकेटीई संस्थेच्या संचालकपदी प्रकाश दत्तवाडे , चंद्रशेखर शहा निवडीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार

इचलकरंजी / प्रतिनिधी

टेक्स्टाईल आणि इंजिनिअरींग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या आणि जागतिक नकाशावर आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या दत्ताजीराव कदम टेक्स्टाईल आणि इंजिनिअरींग इन्स्टिट्युट अर्थात डीकेटीई या शैक्षणिक संस्थेच्या संचालकपदी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे आणि श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेजचे क्रीडाशिक्षक चंद्रशेखर शहा यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते प्रकाश दत्तवाडे आणि चंद्रशेखर शहा यांचा सत्कार करण्यात आला.

इचलकरंजी येथील ताराराणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश दत्तवाडे आणि चंद्रशेखर शहा हे राजकीय आणि सामाजिक दोन्ही क्षेत्रात सदैव अग्रेसर असून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. श्री. दत्तवाडे हे मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ आणि कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट अँड इंटींग्रेटेड टेक्स्टाईल पार्क अर्थात केएटीपी या संस्थेचे चेअरमन तसेच विविध सहकारी संस्थांमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर चंद्रशेखर शहा यांनी क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांनी माजी नगरसेवक म्हणून काम केले आहे. तर सध्या ते कोल्हापूर जिल्हा शारिरिक शिक्षक संघटना उपाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोशिएशनचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत.दत्ताजीराव कदम टेक्स्टाईल आणि इंजिनिअरींग इन्स्टिट्युट अर्थात डीकेटीई या शैक्षणिक संस्थेच्या संचालकपदी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे आणि श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेजचे क्रीडाशिक्षक चंद्रशेखर शहा यांची निवड करण्यात आली.या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

C मराठीसाठी सागर बाणदार इचलकरंजी

प्रतिक्रिया व्यक्त करा